गोंडगाव विदयालयात श्यामची आई एकपाञी नाटय प्रयोग सादर.
भडगाव प्रतिनिधी :-
अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला हेलस. ता. मंठा. जि. जालना स्व. दत्ताञय हेलसकर विचारमंच प्रस्तुत श्यामची आई एकपाञी नाटयप्रयोग गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात अभिनेते श्री.महेंद्र वाकोडकर यांनी उत्कृष्टरीत्या सादर केले. ते म्हणाले कि, आईने दिलेली शिकवण हीच मुलांसाठी सर्वोत्तम शिकवण असते. आईचे ह्रदय जरी हळवे असले तरी तीला काही वेळेस आपल्या मुलाच्या भविष्यासाठी कठोरही व्हावे लागते. साने गुरुजी हे मातृह्रदयी होते. असे मांडत त्यांनी श्यामच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. श्याम प्रमाणे मुलांनीही आईच्या आज्ञेचे पालन करावा असा संदेश दिला. श्यामच्या बालपणीच्या आठवणी विनोदी शैलीत वेळोवेळी मांडत असतांना विदयार्थ्यांमध्ये एकच हास्य पिकल्याचे दिसुन आले.
हा कार्यक्रम दि. २१ रोजी दुपारी १ वाजता आयोजीत करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे हे होते. कार्यक्रमाचे सुञसंचलन क्रीडाशिक्षक श्री. एस. डी. चौधरी यांनी केले. तसेच यावेळी श्री. महेंद्र वाकोडकर यांचा सत्कार विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री.बी. जी. ननावरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक बापुसो, श्री. बी. जी. ननावरे, श्री. एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री.एस. आर. पाटील, श्री.एस. वाय. पाटील, श्री. पी. व्हि. सोळंके, श्री. बी. डी. बोरसे, श्री.आर. एस. सैंदाणे, श्री. एस. आर. महाजन, श्री. ए. एम. साळुंखे, लिपीक श्री.पी. जे. देशमुख, श्री.एस. जी. भोपे, श्री. ए. एम. परदेशी, श्री.एस. एल. मोरे आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने हजर होत्या.
श्री. महेंद्र वाकोडकर यांचा अभियंता ते अभिनेता — श्री. महेंद्र वाकोडकर यांचे मुळ गाव कळमनुरी जि. हिंगोली आहे. ते सार्वजनिक बांधकाम विभागात सेवानिवृत्ती अभियंता आहेत. बालपणापासुन नाटयक्षेञाची आवड होती. माञ घरच्या गरीब परीस्थितीमुळे शिक्षण पुर्ण करुन सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणुन नोकरी केली. नाटर शास्ञातही विदयापिठाची पदवी घेतलेली आहे. नाटय, चिञपट क्षेञात जाण्याची सुरुवातीपासुन इच्छा होती. माञ नोकरी स्विकारली होती. राज्यनाटक स्पर्धा, एकांकीका स्पर्धा यात सहभाग घेतला. तसेच मराठी चिञपट सरीवर सरी, सप्तपदी तसेच हिंदी चिञपट शिकार अजय देवगन सोबत काम केलेले आहे.
श्यामची आई एकपाञी नाटय प्रयोग २० वर्षापासुन करीत आहेत. आतापर्यंत २ हजार प्रयोग झालेले आहेत.
विदयार्थ्यांच्या मनोभुमीत संस्काराची बीजे रोवण्यासाठी श्यामची आई हा एकपाञी नाटय प्रयोग करीत आहेत. असे त्यांनी सांगीतले.





