खिचपुरी महोत्सवाचा चाळीसगावचे नगरसेवक दिपक पाटील यांनी घेतला आनंद.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील कनाशी येथे दर सात वर्षांनी खिचपुरी महोत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. या महोत्सवात शिवसेना नेत्या
वैशाली सुर्यवंशी यांनी उस्फुर्त सहभाग घेऊन महोत्सवाचा आनंद लुटला. या महोत्सवात आयोजकांच्या वतीने वैशाली सुर्यवंशी यांचे स्वागत करण्यात आले.महोत्सवात गीता पाठ, शोभायात्रा, भजन पूजन कार्यक्रमाचा आनंद घेत या मंगलमय वातावरणात त्या तल्लीन झाल्या. यावेळी भाविकांची मांदियाळी खिचपुरी महोत्सवाची शोभा वाढवत होती.
तसेच यावेळी जिल्हयाचे माजी पालकमंञी डाॅ. सतीष पाटील, चाळीसगाव नगर परीषदेचे माजी नगरसेवक दिपक पाटील यांचेही आयोजकांच्या वतीने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी नवल पाटील, समाधान भोपे,वसंत पाटील, वसंत पाटील, समाधान पुजारी यांचेसह नागरीकांचे सहकार्य लाभले
तसेच या कार्यक्रमात पञकार अशोक परदेशी, प्रमोद ललवाणी यांचाही सत्कार करण्यात आला.