IMG 20260721 WA1352

कजगावमध्ये चोरट्यांचा पुन्हा डाव; पाच पावली माता नगरमध्ये बंद घर फोडण्याचा प्रयत्न

51 / 100 SEO Score

कजगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; पाच पावली माता नगरमध्ये बंद घर फोडण्याचा प्रयत्न

 

भडगाव ता.प्रतिनिधी आमीन पिंजारी 

कजगाव परिसरात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी सिटी पाटील कॉलनीतील तीन घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी रोकड लंपास केल्याची घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री पाच पावली माता नगर येथे आणखी एक चोरीचा प्रयत्न उघडकीस आला.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पाच पावली माता नगर येथील विनोद प्रतापसिंग राजपूत यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरातील कपाटांची उलथापालथ करण्यात आली. मात्र, चोरट्यांच्या हाती नेमके काय लागले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

घटनेची माहिती मिळताच कजगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

दरम्यान, सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कजगाव परिसरात रात्रीच्या पोलीस गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. अनेक दिवसांपासून रात्रीचा प्रभावी पोलीस बंदोबस्त नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

 

याशिवाय, कजगावमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असली, तरी अद्याप प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

 

भडगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कजगावमध्ये चोरी, घरफोडी व दरोड्यासारख्या घटना वारंवार घडत असल्याचे सांगत नागरिकांनी तातडीने पोलीस बंदोबस्त वाढविणे, नियमित रात्रीची गस्त सुरू करणे आणि गावात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. भविष्यात मोठी चोरी किंवा अन्य गंभीर गुन्हे घडू नयेत, यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

0Shares

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!
Scroll to Top