मावशीवरच बलात्काराचा प्रयत्न, संतापलेल्या आईने मुलाला ठार केलं आणि नंतर 5 तुकडे करुन.!!!

पोलीसही चक्रावले

0 146

मावशीवरच बलात्काराचा प्रयत्न, संतापलेल्या आईने मुलाला ठार केलं आणि नंतर 5 तुकडे करुन.!!!

पोलीसही चक्रावले

 

आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने फक्त आपल्या मुलाची हत्याच केली नाही, तर त्याच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर महिलेने त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्नही केला.

या घटनेनंतर परिसराच एकच खळबळ उडाली आहे. हत्येनंतर महिला फरार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, महिलेचा शोध घेतला जात आहे. आंध्र प्रदेशात ही घटना घडली आहे.

 

प्रकाशम जिल्ह्यातील एका 57 वर्षीय महिलेने आपल्या मुलाच्या गैरवर्तनामुळे निराश होऊन नातेवाईकांच्या मदतीने त्याची हत्या केली आणि त्याच्या शरीराचे पाच तुकडे केले, असं पोलिसांनी शनिवारी सांगितलं. प्रकाशमचे पोलिस अधीक्षक ए आर दामोदर यांनी दिलेल्या माहितीनुसरा, 57 वर्षीय के लक्ष्मी देवीने 13 फेब्रुवारीला आपला मुलगा 35 वर्षीय के श्याम प्रसाद याची हत्या केली. मुलगा सफाई कर्मचारी होता. लक्ष्मी देवीला हत्येमध्ये तिच्या नातेवाईकांनी मदत केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे.

 

मुलाकडून मावशीवरच बलात्काराचा प्रयत्न

 

पोलीस अधिक्षकांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “आपल्या मुलाच विकृत आणि असभ्य वर्तन सहन न झाल्याने लक्ष्मी देवीने मुलाची हत्या केली”. मिळालेल्या माहितीनुसार, प्रसादने बंगळुरू, खम्मम आणि हैदराबादमधील त्याच्या मावशी आणि इतर नातेवाईकांशीही असभ्य वर्तन केलं होतं.

 

प्रसाद अविवाहित होता, त्याने हैदराबाद आणि नरसरावपेटा येथील आपल्या मावशींवर बलात्काराचा प्रयत्न केला होता अशी धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुऱ्हाड किंवा धारदार शस्त्राने त्याची हत्या करण्यात आली.

 

हत्या केल्यानंतर लक्ष्मी देवीने आपल्या मुलाच्या मृतदेहाचे पाच तुकडे केले. यानंतर हे तुकडे तीन पोत्यांमध्ये भरले आणि त्यानंत कुंबम गावातील नाकालागंडी कालव्यात फेकून देण्यात आले. हत्येनंतर आरोपी महिला फरार आहे. तिच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 103(1) आणि 238 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!