विखरण गावाचा सर्वांगिण विकासासाठी सदैव कटीबद्द. आमदार अमूल चिमनराव पाटील.!!!
एरंडोल प्रतिनिधी :-
तालुक्यातील विखरण येथील ग्रामस्थांचा वतीने विविध विकासकामांचा भुमीपुजन सोहळा व नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यासमयी श्री विठ्ठल मंदीरास सभामंडप, श्री महादेव मंदीरास सभागृह, आदीवासी वस्तीत सभामंडप, युवकांसाठी अभ्यासिका, आदीवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक बसविणे यासह अन्य कामांचे भुमीपुजन करण्यात आले.
विखरण येथील ग्रामस्थांनी मागणी केलेले प्रत्येक काम हे प्राधान्याने पुर्ण होत आहे. आजवर विखरण गावासाठी अनेक कामे मंजुर झाली आहेत, त्यातली अनेक कामे पुर्ण झाली, काही कामे आता भुमीपुजनानंतर सुरू होणार आहेत तर काही कामे ही प्रशासकीय बाबी पुर्ण करून सुरू होणार आहेत व येत्या काळात गावाचा सर्वांगिण विकासासाठी व्हिजन ठेवुन मुलभुत सुविधेसह दळणवळण, आरोग्य, शिक्षण, शेती या क्षेत्रात भरीव काम करायचे आहे.
येत्या काळात उर्वरीत कामांना देखील प्राधाध्याने पुर्ण करण्यासाठी सदैव कटीबद्द असल्याचे उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधतांना सांगितले.
प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख प्रा.मनोजभाऊ पाटील, बाजार समिती मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, मा.सभापती बापु पाटील, जिल्हा दुध संघाचे संचालक दगडु चौधरी, मा.उपनगराध्यक्ष कुणालभाऊ महाजन,
सामाजिक कार्यकर्ते पन्नाभाऊ सोनवणे, मा.तालुकाप्रमुख बबलुदादा पाटील, तालुकासंघटक संभाआबा पाटील, बाजार समिती संचालक देविदास चौधरी सर, नाना कोळी, युवासेना तालुकाप्रमुख कमलेश पाटील, टोळी येथील बाळासाहेब पाटील यांचेसह विखरण ग्रामपंचायत,
विकासो व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.