एकनाथ शिंदेंचे एकापाठोपाठ एक नवे डाव; महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना.?

0 31

एकनाथ शिंदेंचे एकापाठोपाठ एक नवे डाव; महाराष्ट्रातल्या मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत तर नाही ना?

महाराष्ट्रातील राजकारण समजणे हे सोपे काम नाही. संपूर्ण देशात महाराष्ट्राचे राजकारण हेच सर्वात गुंतागुंतीचे आहे. येथील राजकीय पक्ष आणि नेत्यांचे हेतू समजणे कठीण आहे. कोणाच्या मनात काय चालले आहे.?

हे सांगणे सर्वात कठीण काम आहे. महाविकास आघाडी व महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून सुरु असलेली रस्सीखेच पाहता दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. दोन्ही आघाडीचे लक्ष सध्या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर आहे.

 

 

दोन महिन्यापूर्वीच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. त्यानंतर राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आली. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नव्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची मोठी मनधरणी करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या कष्टाने ते राजी झाले होते. पण राज्याचे माजी मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री होणे मान्य नाही असेच सध्याच्या त्यांच्या भूमिकेवरून दिसत आहे.

 

शपथविधी सोहळ्यापासूनच शिंदे हे नाराज असल्याचे जाणवत आहे. त्यामुळेच ते मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारत आहेत. तर अलीकडे ते अनेकवेळा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमधून गायब राहिले आहेत. त्यामुळेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध ताणले गेल्याची चर्चा जर धरत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांतील घटनांवरून भाजपला आता यामधून त्यांची सुटका करायची आहे, असे संकेत मिळत आहेत. त्याची नेमकी काय कारणे आहेत ते जाणून घेऊ.

 

 

फडणवीसांची ठाकरे गट, मनसेच्या नेत्यासोबत बैठक

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीला आणखी एक पदर जोडला आहे. राज्यातील अनेक पक्षांना महायुती आणि महाविकास आघाडीपासून दूर जाऊन बीएमसी निवडणूक स्वबळावर लढवायची आहे, असे मानले जाते आहे. त्यातच फडणवीस यांनी मनसे व उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याची भेट घेतली. एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसावर नाराज आहेत. त्यामुळेच या दोन पक्षाच्या नेत्याचे त्यांनी भेट घेतल्याने त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या काळात लवकरच महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी आघाडी व महायुतीसोडून स्वबळावर लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे फडणवीस यांनी मनसे व ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतल्याची चर्चा रंगली आहे.

 

 

एकनाथ शिंदेंच्या फ्लॅगशिप योजनांना लावला जातोय ब्रेक

 

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांची लोकप्रियता वाढत होती. सामान्य जनतेच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकतील आणि त्यांना थेट भावतील, अशा योजना एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून सुरु केल्या होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद करण्याचा निर्णय फडणवीसांनी घेतला. तसेच ‘आनंदाचा शिधा’ आणि ‘शिवभोजन थाळी’ या दोन लोकप्रिय योजनाही बंद करण्याबाबत राज्य सरकारचा विचार सुरु आहे. या सगळ्या योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरु करण्यात आल्या होत्या. या योजना भविष्यात बंद झाल्या तर हा शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का असणार आहे.

 

 

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी

 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूपच नाराज आहेत, असा प्रकारचा मेसेज कुठेतरी मुद्दाम पसरवला जात आहे. एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसापासून त्यांना मुख्यमंत्री न केल्याच्या धक्क्यातून अजूनही सावरले नाहीत. काही गोष्टीवरून फडणवीस आणि शिंदे यांच्यात उघड मतभेद दिसत आहेत. त्यातच काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांचे फोन टॅप केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे गेलेल्या काही दिवसापासून एकनाथ शिंदे हे सध्या चिंतित आहेत.

 

शिंदे यांना ही संशय आहे की, त्यांच्या हालचालीवर दिल्लीतील तपास यंत्रणेचा वॉच आहे. त्यामुळे त्यांची नाराजी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहत आहेत. तर दुसरीकडे शिंदे पुन्हा मुख्यमंत्री न झाल्याचा मोठा धक्का त्यांना बसला असल्याची चर्चा आहे. त्यातच ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामुळे सध्या शिंदेंच्या शिवसेनेची कोंडी झाली आहे.

 

 

शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेच्या कार्याचे कौतुक

 

दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्या कार्यचे कौतुक केले. त्यामुळे दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने पवारांवर टीका केली. तर याच वेळी एकनाथ शिंदे यांनी मोदी-शहांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. मात्र, या सर्व घटनाक्रमाने महाविकास आघाडीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच कारणावरून ठाकरे यांच्या सेनेनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा