तुझी पत्नी सुंदर आहे, एकटीला पाठव, बिल कमी करतो.विद्युत अभियंत्याच्या मागणीने एकच खळबळ.!!!

0 48

तुझी पत्नी सुंदर आहे, एकटीला पाठव, बिल कमी करतो.विद्युत अभियंत्याच्या मागणीने एकच खळबळ.!!!

उत्तर प्रदेश :-

लाईट बिल कमी करुन देण्याच्या बदल्यात पत्नीला आपल्याकडे घेऊन येण्याची ऑफर दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित शेतकऱ्याने वीज विभागाच्या जेई (कनिष्ठ अभियंता) वर गंभीर आरोप केले आहे.

बाराबंकीमधील  एका शेतकऱ्याने विद्युत विभागाचा कार्यकारी अभियंता प्रदीप गौतम  यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘तुझी पत्नी खूप सुंदर आहे.

तुला बिल कमी करायचे असेल तर तिला माझ्याकडे एकटी पाठव,’ अशी मागणी या अधिकाऱ्याने केल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

शेतकऱ्याने मुख्यमंत्री पोर्टलवर  या संदर्भात तक्रार केली आहे. 13 मार्च रोजी अभियंता तपासणीसाठी त्यांच्या घरी पोहोचला होता, त्यावेळी त्याने ही मागणी केली, असा आरोप शेतकऱ्याने केला आहे. 31 जानेवारी रोजी विद्युत विभागाच्या कार्यालयात गेल्यावरही अधिकाऱ्याने तोडलेले कनेक्शन जोडून बिल दुरुस्त करण्याच्या नावाखाली हीच मागणी केली.

‘माझ्या घरात फक्त 2 एलईडी लाईट आणि 1 टेबल पंखा आहे, तरी मला 94 हजार 864 रुपये वीज बिल आले. 2 वर्षात इतके बिल कसे काय होऊ शकते? अधिकारी प्रदीप कुमारने वाईट हेतूने मला जास्त बिल पाठवले आणि पत्नीला त्याच्याकडे पाठवण्याची मागणी केली,’ असा आरोप शेतकऱ्याने केला आहे.

अमरजीत रावत  असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ‘घरात एसी , फ्रीज, कूलर काही नाही. 1 वर्षापासून वीज नाही. मागील वर्षी अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन कापून टाकले. त्यानंतर आजपर्यंत ते जोडले नाही,’ असेही शेतकऱ्याने सांगितले.

दरम्यान, ‘माझ्यावर केलेले आरोप चुकीचे आणि निराधार आहेत. संबंधिताविरोधात मी गुन्हा दाखल केला आहे. 13 मार्च 2024 रोजी आम्ही त्यांच्या घरचे कनेक्शन कापले होते. मी अमरजीत रावतला ओळखतही नाही. ते 31 जानेवारीलाच मला भेटायला आले होते, परंतु मी बाहेर असल्याने भेट झाली नाही. थकबाकी पैसे जमा करत नसल्याने वीज कनेक्शन कापले होते. पैसे जमा करावे लागू नये यासाठी माझ्यावर असे आरोप केले आहेत,’ असे प्रदीप कुमार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा