महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर संपन्न.!!!

तरुण उत्साही सेवा मंडळ आणि सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम

0 65

महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर संपन्न.!!!

 

तरुण उत्साही सेवा मंडळ आणि सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) श्री मारुती मंदिर, बी.डी.डी. चाळ, एन.एम. जोशी मार्ग, डिलाईड रोड येथे सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर शनिवार, १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि रुग्णालयाने दिलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि सल्लामसलतीचा लाभ घेतला. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री मारुती मंदिर आणि संत रोहिदास समाज, विभाग क्रमांक ४ पार्वती बाई बाबाची सावंत फाउंडेशन यांच्या विद्यमाने दीपेश सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

या शिबिराला विद्यमान आमदार सुनील भाऊ शिंदे यांनी भेट दिली आणि या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. भाजप युवा अध्यक्ष शिवडी विधानसभा विशाल कांबळे तसेच जनसेवक अनिल जाधव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

तरुण उत्साही सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण चिपळूणकर, महिला अध्यक्षा उज्वला दीपक मोरवणकर, चिटणीस आनंद केळशिकर, महिला चिटणीस सुपिया मुकुंद वायगणकर, उपाध्यक्ष गीता विनोद कदम, चिटणीस सुप्रिया मुकुंद वायंगणकर, उपचिटणीस रतिका हरिश तुरळकर, खजिनदार दर्शना विजय वाघेला, उपखजिनदार कविता भारत सावर्डेकर यांना रोहिणी भगवान सावर्डेकर, गौरी गणेश खोपकर, रश्मी राजेश सावर्डेकर, श्वेता शैलेद्र चिपळूणकर, ममता प्रभाकर जाधव, रजनी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलच्या टीमचे नेतृत्व डॉ. प्रियंका स्वामी चढ्ढा यांनी केले, ज्या रुग्णालयाच्या आउटरीच विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत सुजाता संजय खडसे आणि रुग्णालयात परिचारिका असलेल्या वैशाली बनसोडे आणि वर्षा घोंगडे सेवा देत होत्या.

 

मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर खूप यशस्वी झाले, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि रुग्णालयाने दिलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि सल्लामसलतीचा लाभ घेतला. स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरजू महिलांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

तरुण उत्साही सेवा मंडळ आणि सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विभागातील नागरिक विशेषतः महिला कौतुक करत आहेत, जे समाजातील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

बातमी कॉपी करण्यापेक्षा फॉरवड करा