जळगावमहाराष्ट्रसामाजिक

“हर हर महादेव” च्या जयघोषात कासोदा येथे महाशिवरात्रीचा भव्य व सामाजिक उपक्रमांनी नटलेला कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!! 

“हर हर महादेव” च्या जयघोषात कासोदा येथे महाशिवरात्रीचा भव्य व सामाजिक उपक्रमांनी नटलेला कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!“हर हर महादेव” च्या जयघोषात कासोदा येथे महाशिवरात्रीचा भव्य व सामाजिक उपक्रमांनी नटलेला कार्यक्रम उत्साहात संपन्न.!!!

कासोदा प्रतिनिधी :- शैलेश पांडे

सालाबादप्रमाणे यावर्षीही कासोदा येथील महेश मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी (१५ तारखेला) पहाटे ६ वाजता काकडा आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आरतीनंतर भाविकांसाठी साबुदाणा प्रसादाचे वाटप करण्यात आले. याचवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करून समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्यात आले.

जय भोले ग्रुपच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुरेख समन्वय साधत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरातून Indian Red Cross Society रक्तपेढीस एकूण १३० रक्तपिशव्यांचे योगदान देण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सायंकाळी ५ वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. या मिरवणुकीत भगवान शंकराच्या विविध रूपांचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक झाक्या, सजवलेले रथ व भक्तिमय घोषणांनी संपूर्ण गाव परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. रात्री १० वाजेपर्यंत मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली.

या संपूर्ण कार्यक्रमात गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. धार्मिक कार्यक्रमासोबतच रक्तदानासारखा सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल समस्त गावकऱ्यांनी जय भोले ग्रुपच्या कार्याचे कौतुक करून आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले. महाशिवरात्रीचा हा सोहळा भक्ती, सेवा आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरला, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!