जळगावशैक्षणिक

देशमुख महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!

देशमुख महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

याप्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक विजय देशपांडे, सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अरुण पाटील, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी ए. डी. जाधव, सेवानिवृत्त प्राध्यापक पी. डी. पाटील, प्रा. एस. आर. पाटील, डॉ.‌ ए. एन. भंगाळे, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ. दिनेश तांदळे यांनी संचलन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!