Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 3

नगरदेवळे येथे पोलीस स्थापना दिन व पत्रकार दिन उत्साहात साजरा.!!!

0

जिल्हा प्रतिनिधी :- अलिराजा खान

नगरदेवळे ता. पाचोरा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १० जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिन सप्ताह तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस व पत्रकार बांधवांचा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम शिक्षण समितीचे संचालक दादासाहेब किशोर पाटील, आप्पासाहेब जगन्नाथ पाटील, तात्यासाहेब वामन पाटील, दादासाहेब अब्दुल गनी शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मोरे, तसेच संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, सोनू परदेशी, अली रजा खान, फारुख शेख, अतुल भावसार, सौरव तोष्णीवल, जावेद शहा या पत्रकार व पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन करताना सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती दादा मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षकांविषयी आदर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांची उदाहरणे देत जीवन शिस्तबद्ध, मूल्याधिष्ठित व प्रगतिशील कसे घडवावे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.

विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण काटकर यांनी आपल्या भाषणात पोलीस व पत्रकार यांची समाजातील भूमिका स्पष्ट केली. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सत्य व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे कार्य हे दोन्ही घटक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब शिवनारायण जाधव यांनी पत्रकार व पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. यू. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. डी. पी. राजपूत यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

0

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!

125 तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

कासोदा प्रतिनिधी :-

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून रविवार, दि. 11 जानेवारी 2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन व पोलीस पाटील संघटना, कासोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर उपक्रमास कासोदा परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण 125 परीक्षार्थींनी या सराव परीक्षेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेची ओळख होावी, लेखी परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कासोदा पोलीस स्टेशनतर्फे परीक्षार्थींना काळा पेन, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा पूर्णपणे शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. परीक्षा संपल्यानंतर सर्व परीक्षार्थींंसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.

या उपक्रमाबाबत परीक्षार्थींनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले असून, अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत असल्याचे मत अनेक परीक्षार्थींनी व्यक्त केले.

हा पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!

0

महाराष्ट्राचे वादळ तेलंगणात धडकणार,५८ व्या राष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी ‘मिशन चॅम्पियन’ सज्ज.!!!

जेतेपदावर नाव कोरण्यासाठी महाराष्ट्राचे वाघ सज्ज मुंबई उपनगरचा निहार दुबळे व पुण्याची रितिका राठोड कर्णधारपदी

पुणे : अस्सल मराठी मातीतील खेळ असलेल्या खो-खोचा रणसंग्राम आता तेलंगणाच्या भूमीत पेटणार असून महाराष्ट्राची फौज जेतेपदाचा झेंडा रोवण्यासाठी सज्ज झाली आहे. काजीपेठ (तेलंगणा) येथील रेल्वे ग्राउंडवर ११ ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान होणाऱ्या ५८ व्या पुरुष व महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने आपले पुरुष व महिला संघ जाहीर केले आहेत. हे संघ सहभागापुरते नसून जेतेपदावर दरारा निर्माण करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरले आहेत.

प्रशिक्षण शिबिरातून आत्मविश्वासाचा नवा जोश

स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर बीड येथील राजश्री शाहू कन्या शाळेच्या मैदानावर यशस्वीरीत्या पार पडले. शिबिराचा समारोप महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी सरचिटणीस प्रा. जनार्दन शेळके व सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. दोन्ही संघ सुवर्णपदक जिंकतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर महाराष्ट्राचे दोन्ही संघ काजीपेठ, तेलंगणा येथे रवाना झाले.

गटवारीचा थरार : ‘अ’ आणि ‘ब’ गटात महाराष्ट्र सज्ज

भारतीय खो-खो महासंघाच्या गटवारीनुसार पुरुष संघ ‘ब’ गटात असून उत्तर प्रदेश, मणिपूर, जम्मू–काश्मीर व मेघालय यांच्याशी लढत देणार आहे. महिला संघ ‘अ’ गटात असून उत्तर प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश व चंदीगड ही आव्हाने असतील. दोन्ही गटांत फेव्हरेट म्हणून महाराष्ट्र आपली ताकद दाखवणार आहे.

पुरुष संघ : अनुभव, वेग आणि आक्रमणाची संगत

कर्णधार : निहार दुबळे (मुंबई उपनगर) यांच्या नेतृत्वाखाली पुरुष संघात अनुभवाची भक्कम फळी आहे. संघात शुभम थोरात, प्रतिक वाईकर, सुयश गरगटे, रुद्र थोपटे (सर्व पुणे), अनिकेत चेंदवणकर, निहार दुबळे (कर्णधार), प्रतिक देवरे, ऋषिकेश मुर्चावडे (सर्व मुंबई उपनगर), विजय शिंदे, सचिन पवार (सर्व धाराशिव), अक्षय मासाळ, अभिषेक केरीपाळे (सर्व सांगली), शुभम उतेकर (ठाणे), वेदांत देसाई (मुंबई), तुकाराम कारंडे (बीड) यांचा समावेश आहे. प्रशिक्षक : डॉ. नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), सहाय्यक प्रशिक्षक : अजित शिंदे (सोलापूर), व्यवस्थापक : प्रफुल हाटवटे (बीड) अशी मार्गदर्शक फळी आहे.

महिला संघ : रणरागिणींचा आत्मविश्वास आणि धार

कर्णधार : रितिका राठोड (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली महिला संघात धाराशिवचे वर्चस्व दिसून येते. संघात अश्विनी शिंदे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, संपदा मोरे, मैथिली पवार, तन्वी भोसले (सर्व धाराशिव), प्रियांका इंगळे, कोमल दारवटकर, श्वेता नवले, रितिका राठोड (कर्णधार) (सर्व पुणे), रेश्मा राठोड, पूजा फरगडे (सर्व ठाणे), सरिता दिवा (नाशिक), प्रतिक्षा बिराजदार (सांगली), पायल पवार (रत्नागिरी) या रणरागिणी मैदानात उतरतील. प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : निकिता पवार (धाराशिव), व्यवस्थापिका : सुनिता जायभाय (बीड) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

मार्गदर्शकांचे बळ, व्यवस्थापनाची ठाम साथ

दोन्ही संघांसोबत अनुभवी प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक व व्यवस्थापनाची मजबूत टीम असल्याने तांत्रिक तयारी, डावपेच आणि मानसिक बळ या तिन्ही आघाड्यांवर महाराष्ट्र सज्ज आहे.

शुभेच्छांचा वर्षाव : सुवर्णमय स्वप्नासाठी एकजूट

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष मा. ना. श्री. अजित पवार, कार्याध्यक्ष श्री. सचिन गोडबोले, सरचिटणीस प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव व खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांनी खेळाडूंना सुवर्णमय यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

तेलंगणाच्या भूमीत महाराष्ट्राचे वादळ घोंघावणार—जेतेपदाचा निर्धार, मैदानावरचा वेग आणि संघभावना यांची दमदार परीक्षा आता सुरू!

भडगाव तालुक्यात विश्व मानव रूहानी केंद्रातर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.!!!

0

भडगाव  प्रतिनिधी : –

भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी येथे विश्व मानव रूहानी केंद्र, नवानगर (हरियाणा) यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, खेडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.

विश्व मानव रूहानी केंद्र हे गोरगरीब, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने विविध जनहितकारी योजना राबवित असून शिक्षण, आरोग्य व सामाजिक मदत या क्षेत्रात संस्थेचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. तसेच रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड, औषधे व आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध करून देत मानवतेचे कार्य करण्यात आले होते.

याच सामाजिक बांधिलकीतून सध्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज एकाच दिवशी भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.

या उपक्रमाबद्दल खेडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच वसंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी विश्व मानव रूहानी केंद्राचे प्रमुख बलजीत सिंहजी महाराज साहेब व संस्थेच्या सर्व सेवेदारांचे मनापासून आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

या सेवाकार्यात खेडगाव मानव केंद्राचे फर्स्ट मेंबर नानाभाऊ मिस्त्री, वसंतवाडी येथील फर्स्ट मेंबर प्रकाश राठोड, तसेच चाळीसगाव येथील अनुभवी सेवेदार अशोक आप्पा चौधरी, विजुभाऊ पाटील, रमेश मामा, रवीभाऊ चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या शेवटी गावाच्या वतीने उपस्थित नागरिक, पालक व शिक्षकांनी विश्व मानव रूहानी केंद्राच्या सेवाकार्याचे कौतुक करत सेवेदारांचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

साई भक्तांच्या पायी दिंडीस नगरसेविका समीक्षा पाटील यांची भेट.!!!

0

साई भक्तांच्या पायी दिंडीस नगरसेविका समीक्षा पाटील यांची भेट.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

श्री साई मंदिर, भडगाव येथून पायी दिंडीसाठी प्रस्थान केलेल्या समस्त साई भक्तांची प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील (ताई) यांनी भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी साई भक्तांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाबाबत माहिती घेतली व दिंडीतील शिस्त, भक्तीभाव आणि नियोजनाचे कौतुक केले.

यावेळी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत नगरसेविका सौ. समीक्षा पाटील यांनी, “साईबाबांच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडून या संधीचे सोनं करीन,” असा विश्वास व्यक्त केला.

साई भक्तांच्या पायी दिंडीसाठी आवश्यक त्या सुविधा, सुरक्षितता आणि आरोग्यविषयक बाबींविषयीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. भक्तांच्या प्रवासात कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या भेटीमुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरसेविकेच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. साई नामाच्या जयघोषात भक्तांनी पुढील प्रवासास प्रस्थान केले.

लालबागमध्ये विठुरायाचा गजर, मुंबई झाली भक्तीमय पंढरपूर

0

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने श्री पांडुरंग पालखी स्वागत सोहळा मागील २६ वर्षांपासून अखंडपणे आयोजित केले जात आहे. या परंपरेनुसार लालबाग येथील संत संताजी जगनाडे महाराज चौकात गेल्या दहा वर्षांपासून संत संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या वतीने पालखीचे भव्य, शिस्तबद्ध आणि भक्तिभावपूर्ण स्वागत करण्यात येते. यंदाही वारकरी संप्रदायातील भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.

पालखी स्वागतासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बंधू-भगिनींसह वारकरी भाविकांसाठी अल्पोपाहार व चहा-पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर सामाजिक जाणीव जपत संताजी लेखणी अर्थात पेन तसेच पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही प्रभावीपणे पोहोचविण्यात आला.

कार्यक्रमस्थळी आकर्षक बॅनरच्या माध्यमातून संत संताजी महाराजांनी तुकाराम गाथा लिहिली, ही ऐतिहासिक माहिती वारकरी व परिसरातील नागरिकांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने विशेष मांडणी करण्यात आली होती. या उपक्रमास भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या भक्तीमय सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विजय निगडकर, किशोर मेहेर, राम देशमाने, संतोष पन्हाळे, शिवाजी झगडे, अनिल चौधरी, देविदास राऊत, गजानन घाटकर, सचिन लोखंडे, सुरेश धानके, ॲड. रघुनाथ महाले, मुकुंद चौधरी, सचिन करडिले, संजय डाके, स्वप्नील मावळे, अनिल मावळे, अमित डाके, प्रशांत कसाबे, अशोक करडिले, भरत फल्ले, भूषण खोंड, रूपाली मावळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या वारकरी भाविकांचे, समाज बांधवांचे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अध्यक्ष दिलीप खोंड यांनी मनःपूर्वक आभार मानले. समाजातील विविध मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी साकारण्यात आलेली आकर्षक रांगोळी विशेष लक्षवेधी ठरली, तर समाज बंधू-भगिनींनी फुगड्या खेळत भक्ती आणि आनंदाचा उत्सव साजरा केला. कार्यक्रमाच्या प्रसारमाध्यमांची जबाबदारी संतोष झगडे व नीलेश कसाबे यांनी अत्यंत नियोजनबद्ध व प्रभावीपणे पार पाडली.

भडगाव शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन पदि राजेंद्र परदेशी तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण पाटोळे यांची निवड. 

0

भडगाव प्रतिनिधी:-

भडगाव शेतकरी सहकारी संघाची चेअरमन व व्हाईस चेअरमन साठी दि. ९ रोजी सकाळी ११ वाजता निवडीचा कार्यक्रम व संचालक मंडळाची सभा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा अध्याशी अधिकारी महेश कासार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. शेतकरी सहकारी संघाच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि राजेंद्र लालचंद परदेशी यांची तर व्हाईस चेअरमन पदि हिरामण सुखदेव पाटोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

प्रत्येकी दोघांचे एकमेव अर्ज आल्याने ही निवड जाहीर करण्यात आली.चेअरमन पदाचा भैय्यासाहेब पाटील यांनी तर व्हाईस चेअरमन पदाचा देविदास माळी या दोघांनी ठरल्याप्रमाणे राजीनामे दिले होते या दोघ रिक्त जागांसाठी हा निवडीचा कार्यक्रम घेण्यात आला. नवनिर्वाचीत चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन या दोघांचा सत्कार आमदार किशोर पाटील यांचेसह संचालक मंडळ व उपस्थित नागरीकांमार्फत करण्यात आला. तसेच यानंतर पञकार व अशोकबापु परदेशी यांनीही चेअरमन राजेंद्र परदेशी व व्हाईस चेअरमन हिरामण पाटोळे यांचा सत्कार केला. यावेळी प्रतापराव पाटील, जयवंत पाटील, खुमानसिंग पाटील, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, जयवंत पाटील, गुलाब पाटील, रायचंद परदेशी, हिरामण पाटोळे, शुभांगी पाटील, योजना पाटील, भिमराव पाटील, नागेश वाघ, आदि संचालक तसेच समन्वय समितीचे अध्यक्ष युवराज पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सुधाकर पाटील, डाॅ. प्रमोद पाटील, महेंद्र ततार, जगन भोई, नगराज पाटील, सरदार परदेशी घुसर्डी, कैलास पाटील, रमेश पाटील, विशाल परदेशी, भुतेसिंग परदेशी बांबरुड प्र. ब, वाडे विकासोचे चेअरमन उदयसिंग परदेशी , जितेंद्र परदेशी घुसर्डी, दिनेश परदेशी वडजी, विष्णु भोसले, आमडदे, घुसर्डी विठ्ठल पाटील,पप्पु पाटील,डी. डी. पाटील आदि उपस्थित होते. तर संघाचे मॅनेजर सुरेश पाटील, लिपीक साहेबराव पाटील, दिलीप नरवाडे, विशाल भोई

आदि कर्मचारीही उपस्थित होते.आभार माजी चेअरमन भैय्यासाहेब पाटील यांनी मानले.

मांडकी शिवारात बिबटयाचे झाले दर्शन.चौधरी कुटुंबाची उडाली भंबेरी.!!!

0

मांडकी शिवारात बिबटयाचे झाले दर्शन.चौधरी कुटुंबाची उडाली भंबेरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

भडगाव तालुक्यातील मांडकी शिवारात दि.८ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता मांडकी येथील श्री. संत बाळु मामा मंदिराचे पुजारी सुभाष धनराज चौधरी यांचेसह परीवार चारचाकी गाडीने गावात जात असतांना रस्त्यावरुन बिबटया जातांना बिबटयाचे दर्शन झाले. बिबटया पहाताच चौधरी कुटुंबातील सदस्यांची घबराहट पसरुन भंबेरी उडाली होती. तात्काळ गाडीचे काच बंद करुन घटनास्थळावरुन गाडी भरधाव वेगाने काढली. परीसरात बिबटया वावरत असल्याने शेतकरी, नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले आहे. तरी वनविभागाने या बिबटयाचा तात्काळ बंदोबस्त करावा. नागरीकांची भिती कमी करावी अशी मागणी मांडकी परीसरातील नागरीकातुन होतांना दिसत आहे.

वाळू तस्करीविरोधात प्रशासन आक्रमक ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात.!!!

0

वाळू तस्करीविरोधात प्रशासन आक्रमक ट्रॅक्टर-ट्रॉली ताब्यात.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव शहरातील जुने पिंपळगाव रस्त्यावरील घोडदे परिसरात गिरणा नदी पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर महसूल विभागाने धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर-ट्रॉलीसह एक ब्रास वाळू जप्त केली. सदर कारवाईत पकडलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही कारवाई तहसीलदार शीतल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ९ रोजी करण्यात आली. गिरणा नदी पात्रातून कोणतीही परवानगी न घेता वाळू उपसा करून वाहतूक केली जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यानंतर पथकाने तत्काळ कारवाईचे नियोजन केले. कारवाईदरम्यान अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर रंगेहात पकडण्यात आला.

महसूल पथकाने एक ब्रास वाळू, ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी तहसील कार्यालयात जमा केला आहे. या प्रकरणी संबंधितांविरोधात महसूल व गौण खनिज कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

सदर कारवाई ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे, संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, समाधान हूल्लुळे, निखिल बावस्कर, पोलिस कॉन्स्टेबल कल्पेश अहिरे, महसूल सेवक समाधान माळी आदींच्या संयुक्त पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

दरम्यान, भडगाव तालुक्यातील गिरणा नदीसह अन्य परिसरात अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाकडून नियमितपणे तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून, अशा बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महिंदळे येथील प्रवाशी निवाऱ्यात ग्रामपंचयातीचे आतिक्रमण; बस स्टॅन्ड मध्ये बसवले जल शुद्धीकारण मशीन.!!!    

0

महिंदळे येथील प्रवाशी निवाऱ्यात ग्रामपंचयातीचे आतिक्रमण; बस स्टॅन्ड मध्ये बसवले जल शुद्धीकारण मशीन.!!!    

भडगाव प्रतिनिधी :-

येथील ग्रामपंचायत यांनी गावाला अल्प दरात शुद्ध पाणी मिळावे यासाठी जल शुद्धीकारण मशीन उपलब्ध केले. परंतु बस स्टॅन्ड वरील प्रवाशी निवाऱ्यात त्यांनी मशीन फिट करून प्रवाशांना वाऱ्यावर सोडले आहे. त्वरित प्रवाशी निवाऱ्यातील जल शुद्धीकारण मशीन इतरत्र हलवून प्रवाशांचा हक्काचा निवारा उपलब्ध करून द्यावा. अशा मागणीचे निवेदन देऊन सखोल चौकशीची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

    प्रवाशी निवारा प्रवाशांना कुचकामी.

  प्रवाशांना बस येईपर्यंत ऊन.वारा. पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी शासनाने प्रत्येक गावात प्रवाशी निवारा बांधले आहेत. परंतु येथे मात्र ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा कळसच झाला. ग्रामपंचायत प्रशासनाने चक्क प्रवाशी निवाऱ्यावरच अतिक्रमण करत शुद्ध पाण्याचे मशीन यात बसवून प्रवाशांना उन्हात बसवले आहे.

  याबत ग्रामस्थांनी आमदार किशोर पाटील, तहसीलदार भडगाव,आगार प्रमुख पाचोरा, गटविकास अधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करून प्रवाशी निवारा प्रवाशांसाठी खुला करण्याची मागणी केली आहे.अन्यथा ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

     शासनाचे पैसे गेले पाण्यात.

  शासनाच्या लोकाभिमुख योजनेतून ग्रामपंचायत प्रशासनाने गावकऱ्यांना अल्प दरात शुद्ध पाणी मिळावे या भावनेतून गावासाठी जल शुद्धीकारण मशीन उपलब्ध करून दिले परंतु या मशीनचे शुद्ध पाणी ग्रामस्थांना चाखायला मिळालेच नाही. त्यामुळे शासनाचे पैसे पाण्यात गेले आहेत. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक, यांना प्रवाशी निवाऱ्यातील बंद मशीन काढून प्रवाशांची सोय करण्याची मागणी केली परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभाराचा कळस झाल्याने प्रवाशांना पावसाळ्यात, उन्हात, आसरा घेण्यासाठी जागा शोधावी लागत आहे.        

चौकट – प्रतिक्रिया 

 शासनाने प्रवाशांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी प्रवाशी निवारा बांधला होता. परंतु ग्रामपंचायत प्रशासनाचा मनमानी कारभाराने प्रवाशांच्या हक्काच्या जागेवरच अतिक्रमण करून त्यांच्या डोक्यावरचे छत हिरवले आहे. प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी.राजेंद्र शिवदास पाटील. व ग्रामस्थ महिंदळे.

error: Content is protected !!