साई भक्तांच्या पायी दिंडीस नगरसेविका समीक्षा पाटील यांची भेट.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
श्री साई मंदिर, भडगाव येथून पायी दिंडीसाठी प्रस्थान केलेल्या समस्त साई भक्तांची प्रभाग क्रमांक ८ च्या नगरसेविका सौ. समीक्षा लखीचंद पाटील (ताई) यांनी भेट घेऊन आपुलकीने विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी साई भक्तांशी संवाद साधत त्यांच्या प्रवासाबाबत माहिती घेतली व दिंडीतील शिस्त, भक्तीभाव आणि नियोजनाचे कौतुक केले.
यावेळी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत नगरसेविका सौ. समीक्षा पाटील यांनी, “साईबाबांच्या आशीर्वादाने नगरसेवक म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे. ही जबाबदारी मी पूर्ण निष्ठेने पार पाडून या संधीचे सोनं करीन,” असा विश्वास व्यक्त केला.
साई भक्तांच्या पायी दिंडीसाठी आवश्यक त्या सुविधा, सुरक्षितता आणि आरोग्यविषयक बाबींविषयीही त्यांनी आस्थेने चौकशी केली. भक्तांच्या प्रवासात कोणतीही अडचण उद्भवू नये, यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या भेटीमुळे साई भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, नगरसेविकेच्या सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे. साई नामाच्या जयघोषात भक्तांनी पुढील प्रवासास प्रस्थान केले.




Recent Comments