Monday, January 19, 2026
Google search engine
Home Blog Page 111

 1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

0

1 जानेवारीपासून ‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय.!!!

नवी दिल्ली :-

भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांचा फायदा देशातील करोडो लोकांना होत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत

या योजनांचा लाभ अनेक लोक घेत आहेत. ज्या लोकांना २ वेळेचे जेवण नीट मिळत नाही अशा लोकांसाठी केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे. मात्र आता केंद्र सरकारकडून काही रेशन कार्ड बंद करण्यात येणार आहे.

‘या’ लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द.देशभरातील जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे. त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत. पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

1 जानेवारीपासून केली जाणार कारवाई

बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने १ जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा लोकांची ओळख ई-केवायसी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाणार आहे. त्यामुळे १ जानेवारीपासून काही बनावट शिधापत्रिका बंद होऊ शकतात.

शाळेच्या शिक्षिकेकडून दहावीतील विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

0

शाळेच्या शिक्षिकेकडून दहावीतील विद्यार्थी मुलावर लैंगिक अत्याचार..आरोपी शिक्षिकेस अटक

पुणे प्रतिनिधी :-

खडक पोलिस ठाण्याचे हद्दीत एका इंग्लिश मिडियम शाळेतील २७ वर्षीय शिक्षिकेने स्वत:ची लैंगिक इच्छा भागविण्यासाठी, दहावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रेमाच्या जाळयात ओढून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी शिक्षिकेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर, आरोपी शिक्षिकेस अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या शिक्षिका असून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक पदावर काम करत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेचे कालावधीत पालकत्वाची शिक्षिक या नात्याने संपूर्ण जबाबदारी आपली असते हे माहिती असताना देखील, त्यांनी १० वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थ्याचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन त्याच्या सोबत प्रेमसंबंध जुळवले. तो प्रिलियम परिक्षेस शाळेत हजर असताना, त्यास प्रेमाची भुरळ पाडून शारिरिक संबंधासाठी प्रोत्साहित व उत्तेजीत करुन आपल्या शरीर सुखासाठी त्याचा वापर करुन त्याच्याशी शाळेच्या आवारात शारिरिक संबंध प्रस्थापित करुन अल्पवयीन विद्यार्थ्याची लैंगिक सतावणूक केली. याबाबत खडक पोलिस पुढील तपास करत आहे.

श्रध्दाताई शिंदे यांचा बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम

0

बांधकाम कामगारांना भांडी व ट्रंक वाटप

 

श्रध्दाताई शिंदे यांचा बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम

सांगली (गुरुदत्त वाकदेकर) : संत रोहिदास चर्मकार विकास संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्षा श्रध्दाताई शिंदे‌ यांच्यावतीने बांधकाम कामगारांना ‌भांडी व पेटी वाटप करण्यात आले. त्यांनी बांधकाम कामगारांसाठी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी तसेच समाजबांधव उपस्थित होते.

सदर उपक्रम केवळ बांधकाम कामगारांचा सामाजिक दर्जा सुधारण्यास मदत करेल असे नाही तर त्यांचे जीवनमान सुधारण्यासही हातभार लावेल. या उपक्रमाद्वारे कामगारांना जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे, जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबासह चांगले जीवन जगू शकतील.

सदर उपक्रम केवळ कामगारांसाठीच नाही तर समाजासाठीही एक सकारात्मक विचारांचे पाऊल आहे, याचे कौतुक करायला हवे. हा उपक्रम कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल आणि त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यास हातभार लावेल.

बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!

0

बांबरुड प्र. ब. येथील शेतकरी विनोद परदेशी कृषीरत्न पुरस्काराने सन्मानीत.!!!

भडगाव वार्ताहर —

भारताचे पहिले कृषी मंञी डाॅ. पंजाबराव देशमुख यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त दि. २७ डिसेंबर रोजी नाशिक येथे भडगाव तालुक्यातील बांबरुड प्र. ब. येथील आदर्श शेतकरी तथा परदेशी, राजपुत समाजाचे तंटामुक्त समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष विनोद बालचंद परदेशी यांचेसह रेखाबाई परदेशी असा सपत्निक मान्यवरांच्या हस्ते कृषीरत्न पुरस्कार देऊन ट्राॅफी, सन्मानपञ, साडी देऊन कुटुंबासह सन्मानीत करण्यात आले. यावेळी सोबत परदेशी, राजपुत समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश कोंडु परदेशी, विनोद परदेशी यांची मुलगी ममता परदेशी हे ही कार्यक्रमास उपस्थित होते.

 आमची माती आमची माणसं. जय किसान फार्मस फोरम 

 डॉ पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त भारतातील टॉप टेन मधील जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयराम पुरकर, 

 ब्रिगेडियर सुधीर सावंत मुंबई , सदुभाऊ सळके सेंद्रिय शेती तज्ञ , मा खासदार भास्कर भगरे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा नाशिक येथे पार पडला. पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल विनोद परदेशी यांचे जळगाव जिल्हयातुन अभिनंदन होत आहे. 

फोटो — नाशिक येथे कार्यक्रमात विनोद परदेशी यांचेसह सपत्नीक पुरस्काराने सन्मानीत करतांना मान्यवर, बाजुला उपस्थित समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश परदेशी, ममता परदेशी आदि.

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

0

६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील मुंबई-३ केंद्राचे शानदार उद्घाटन

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित करित असलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या मुंबई-३ केंद्राच्या प्राथमिक फेरीचे उद्घाटन साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे करण्यात आले. सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक प्रमोद पवार, सुप्रसिद्ध अभिनेते अरूण पालव, ज्येष्ठ रंगकर्मी तसेच साहित्य संघ मंदिरचे कार्यवाह सुभाष भागवत, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रम अधिकारी मिलिंद बिर्जे, मच्छिंद्र पाटील तसेच परीक्षक रमाकांत भालेराव, विवेक खेर, प्रतिभा नागपुरे तेटू यांच्या शुभहस्ते तसेच उपस्थितीमध्ये दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन सायली साळवी यांनी केले.

 

६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी प्राथमिक फेरीमध्ये डॉ. तृप्ती झेमसे लिखित तसेच अभिषेक भगत दिग्दर्शित “कॅनिबल” या नाटकाचा प्रयोग सादर करण्यात आला. प्रेक्षकांनी प्रयोगाला हजेरी लावून कलाकारांना खूप छान दाद दिली.

 

स्पर्धेची प्राथमिक फेरी मुंबई-३ केंद्रावर सुरू झाली असून ८ जानेवारी २०२५ पर्यंत या स्पर्धेमध्ये विविध २० नाटकांचे प्रयोग होणार आहेत. स्पर्धेमध्ये सामाजिक समस्या, राजकीय विषय, प्रेमकथा आणि इतर विविध विषयांवर आधारित नाटके सादर करणार आहेत.

 

सांस्कृतिक कार्य विभागाच्यावतीने विकास खारगे, (भा.प्र.से.) अपर मुख्य सचिव तसेच बिभीषण चवरे, संचालक यांनी हौशी कलाकारांचे मनोबल वृद्धिंगत करण्यासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे अशी विनंती केली आहे.

 

तिकीट दर केवळ ₹१५/- आणि ₹१०/- आहे. रोज सकाळी ११:३० आणि संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग होणार आहेत. सदर स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच “रंगभूमी डॉट कॉम” ह्या संकेतस्थळावरून ऑनलाइन तिकीट बुकींग करता येणार आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर हे काम पाहात आहेत.

कविता एक चिंतन, आराधना सरस्वतीची – डॉ. मानसी पाटील

0

This Content Is Only For Subscribers

Please subscribe to unlock this content.
error: Content is protected !!