Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 104

पाचोरा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा संपन्न.!!!

0

पाचोरा येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा संपन्न.!!!

(खंडपीठाचे न्यायमूर्ती व जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश , वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती)

पाचोरा :- किशोर रायसाकडा

पाचोरा येथे राष्ट्रीय , राज्य , जिल्हा व तालुका विधी सेवा प्राधिकरण , वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिलेच भव्यदिव्य विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजना महामेळावा रविवार दिनांक 19 जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती , जिल्ह्यातील सर्व न्यायालयाचे न्यायाधीश व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम क्यू एस एम शेख महाशिबीराच्या अध्यक्षस्थानी होते.

 

 निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये महाशिबीर झाले.याप्रसंगी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती अभय वाघवसे , महाराष्ट्र -गोवा बार कौन्सिलचे पालक सदस्य ॲड अमोल सावंत ,विधी सेवा समितीचे जिल्हा सचिव सलीम सय्यद , जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद , पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी ,न्या. जी बी औंधकर , न्या. एस व्ही निमसे, न्या. जी एस बोरा , जळगावच्या वकील संघाचे ॲड रमाकांत पाटील ,पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष ॲड प्रवीण पाटील , उपाध्यक्षा ॲड कविता रायसाकडा , प्रांत अधिकारी भूषण अहिरे , उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे , तहसीलदार विजय बनसोडे ,पोलीस निरीक्षक अशोक पवार , वैशाली सूर्यवंशी , नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचेसहवकील बांधव व लाभार्थी उपस्थित होते.

 उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. 

याप्रसंगी ॲड प्रविण पाटील यांनी वकील संघाचे कार्य व न्यायालयीन उपक्रमांची माहिती दिली . सलीम सय्यद यांनी विधी सेवा समितीच्या वतीने करण्यात आलेल्या कार्याचा आढावा घेतला. पशु विभागाच्या वतीने लाभार्थ्यांना पशुधन भरपाईचे चेक देण्यात आले. विद्यार्थ्यांना मोफत शालेय गणवेश व शिष्यवृत्तीची रक्कम देण्यात आली. महसूल विभागाच्या वतीने काही लाभार्थ्यांना घरकुलाची चावी व कागदपत्र देण्यात आली. 

पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी जळगाव जिल्ह्यातील पोलीस विभागाची तर जिल्हाधिकारी डॉ आयुष प्रसाद यांनी महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती दिली.

 ॲड अमोल सावंत , न्या. एम क्यू एस एम शेख यांनी न्यायालयीन कामकाज , विधी सेवा समिती , पोलीस व महसूल विभागाचे कामकाज या संदर्भात माहिती दिली.

 न्यायमूर्ती वाघवसे यांनी शासकीय योजना कागदावर न राहता त्या लाभार्थ्या पर्यंत पोहोचणे आवश्यक असते. तसे होत नसल्याने बरेचशे लाभार्थी योजनांपासून वंचित असल्याचे सांगून विधी सेवा समिती व शासकीय अधिकाऱ्यांच्या जबाबदारी संदर्भात मार्गदर्शन केले.

महाशिबीराच्या ठिकाणी विद्यार्थिनींचे लेझीम पथक व तुतारी वादकांनी मान्यवरांचे स्वागत केले. समई , नारळ व व झाडाचे रोप भेट देऊन सत्कार व औक्षण करण्यात आले.

महाशिबिराच्या ठिकाणी पोलीस , महसूल ,आरटीओ आरोग्य ,जिल्हा परिषद , पंचायत समिती , कृषी , महिला व बालकल्याण ,नगरपरिषद ,

बस स्टॅन्ड सह सर्वच शासकीय विभागांच्या वतीने स्टॉल लावून माहिती देण्यात आली. 

शिबिराचे भव्यदिव्य व उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल न्या. जी बी औंधकर , ॲड प्रवीण पाटील , ॲड कविता रायसाकडा , निर्मल स्कूल वैशाली सूर्यवंशी , नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. महाशिबिरास विविध योजनांचे लाभार्थी ,

सर्व न्यायाधीश , वकिल, शासकीय अधिकारी , कर्मचारी , न्यायालयीन कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. गोविंद मोकाशी व सहकाऱ्यांनी स्वागत गीत गायीले. गो से हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले बेटी बचाव बेटी पढाव पथनाट्य उपस्थितांना भाऊक करणारे ठरले.

 

प्रास्ताविक न्यायमूर्ती जी बी औंधकर यांनी केले. जळगावच्या न्या. मनीषा जसवंत यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचलन केले. पाचोरा न्यायालयाचे सहन्यायाधीश एस व्ही निमसे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने समारोप झाला.त्यानंतर न्यायाधीशांनी उपस्थित वकील बांधव, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्याशी विविध योजना व विषयां संदर्भात चर्चा करून सुयोग्य कामकाजा संदर्भात मार्गदर्शन केले.

वरखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदि धनराज शिरसाठ. मिञ परीवारांनी केला त्यांचा सत्कार.!!!

0

वरखेड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदि धनराज शिरसाठ. मिञ परीवारांनी केला त्यांचा सत्कार.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वरखेड ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचीत उपसरपंच पदि धनराज दगा शिरसाठ यांची सर्वानुमते बिनविरोध करण्यात आली. त्यांचा उपसरपंच पदाच्या निवडीवेळी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषीत करण्यात आली.

ऊषाबाई शिरसाठ यांनी आपल्या उपसरपंच पदाचा ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्याने या रिक्त जागेसाठी ही निवड करण्यात आली. ही निवड सरपंच निलाबाई बन्सीलाल भिल्ल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यालयात दि. १७ रोजी दुपारी १२ वाजता करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचीत उपसरपंच धनराज शिरसाठ यांचा ग्रामपंचायत पदाधिकार्यांसह कर्मचारी, नागरीकांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी सरपंच निलाबाई भिल्ल, मावळत्या उपसरपंच ऊषाबाई शिरसाठ, ग्रामपंचायत सदस्या वर्षाबाई शिरसाठ, मिराबाई सुतार, नाना सुतार, विशाल पाटील, सुमिञाबाई पाटील, विजयाबाई पाटील आदि सदस्या तसेच ग्रामसेवक जिवराम पाटील, पोलीस पाटील विकी शिरसाठ व ग्रामपंचायतीचे कर्मचारी वाटरमन मोतीलाल पाटील, सेवक पिंटु पाटील, रोजगाव सेवक अनिल शिरसाठ यांचेसह नागरीक उपस्थित होते. तसेच उपसरपंच धनराज शिरसाठ यांचा सत्कार वाडे गावाचे माजी सरपंच भारत मोरे , गोंडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन प्रमोद मोराणकर, पञकार अशोक परदेशी आदि मिञ मंडळामार्फत सत्कार केला. या निवडीबद्दल धनराज शिरसाठ यांचे सर्वञ अभिनंदन होत आहे.

 

महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर संपन्न.!!!

0

महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर संपन्न.!!!

 

तरुण उत्साही सेवा मंडळ आणि सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल यांचा संयुक्त उपक्रम

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : तरुण उत्साही सेवा मंडळ (रजि.) श्री मारुती मंदिर, बी.डी.डी. चाळ, एन.एम. जोशी मार्ग, डिलाईड रोड येथे सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलच्या सहकार्याने महिलांसाठी मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिराचे आयोजन केले होते. हे शिबिर शनिवार, १८ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी १:०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला विभागातील महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि रुग्णालयाने दिलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि सल्लामसलतीचा लाभ घेतला. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी श्री मारुती मंदिर आणि संत रोहिदास समाज, विभाग क्रमांक ४ पार्वती बाई बाबाची सावंत फाउंडेशन यांच्या विद्यमाने दीपेश सावंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

या शिबिराला विद्यमान आमदार सुनील भाऊ शिंदे यांनी भेट दिली आणि या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला. भाजप युवा अध्यक्ष शिवडी विधानसभा विशाल कांबळे तसेच जनसेवक अनिल जाधव हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

तरुण उत्साही सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण चिपळूणकर, महिला अध्यक्षा उज्वला दीपक मोरवणकर, चिटणीस आनंद केळशिकर, महिला चिटणीस सुपिया मुकुंद वायगणकर, उपाध्यक्ष गीता विनोद कदम, चिटणीस सुप्रिया मुकुंद वायंगणकर, उपचिटणीस रतिका हरिश तुरळकर, खजिनदार दर्शना विजय वाघेला, उपखजिनदार कविता भारत सावर्डेकर यांना रोहिणी भगवान सावर्डेकर, गौरी गणेश खोपकर, रश्मी राजेश सावर्डेकर, श्वेता शैलेद्र चिपळूणकर, ममता प्रभाकर जाधव, रजनी गायकवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

सर एचएन रिलायन्स हॉस्पिटलच्या टीमचे नेतृत्व डॉ. प्रियंका स्वामी चढ्ढा यांनी केले, ज्या रुग्णालयाच्या आउटरीच विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत सुजाता संजय खडसे आणि रुग्णालयात परिचारिका असलेल्या वैशाली बनसोडे आणि वर्षा घोंगडे सेवा देत होत्या.

 

मोफत स्तन आणि गर्भाशय कर्करोग शिबिर खूप यशस्वी झाले, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि रुग्णालयाने दिलेल्या मोफत आरोग्य तपासणी आणि सल्लामसलतीचा लाभ घेतला. स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि गरजू महिलांना मोफत आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

 

तरुण उत्साही सेवा मंडळ आणि सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विभागातील नागरिक विशेषतः महिला कौतुक करत आहेत, जे समाजातील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणाला चालना देण्यासाठी महत्वाचे पाऊल आहे.

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

0

राज्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि राज्यमंत्री यांची जिल्हा पालकमंत्री तसेच सह-पालकमंत्री म्हणून सामान्य प्रशासन विभागाने नियुक्ती केली आहे. यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असणार आहे तर ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडे गडचिरोलीचे सहपालकमंत्रीपद सोपविण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई शहर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 

उर्वरित जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची व सहपालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :

 

नागपूर व अमरावती : चंद्रशेखर बावनकुळे

अहिल्यानगर : राधाकृष्ण विखे-पाटील

वाशीम : हसन मुश्रीफ

सांगली : चंद्रकांत पाटील

नाशिक : गिरीश महाजन

पालघर : गणेश नाईक

जळगाव : गुलाबराव पाटील

यवतमाळ : संजय राठोड

मुंबई उपनगर : ॲड.आशिष शेलार तर सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा

रत्नागिरी : उदय सामंत

धुळे : जयकुमार रावल

जालना : श्रीमती पंकजा मुंडे

नांदेड : अतुल सावे

चंद्रपूर : डॉ.अशोक उईके

सातारा : शंभूराज देसाई

रायगड : कु.आदिती तटकरे

लातूर : शिवेंद्रसिंह भोसले

नंदुरबार : ॲड.माणिकराव कोकाटे

सोलापूर : जयकुमार गोरे

हिंगोली : नरहरी झिरवाळ

भंडारा : संजय सावकारे

छत्रपती संभाजीनगर : संजय शिरसाट

धाराशिव : प्रताप सरनाईक

बुलढाणा : मकरंद जाधव (पाटील)

सिंधुदुर्ग : नितेश राणे

अकोला : आकाश फुंडकर

गोंदिया : बाबासाहेब पाटील

कोल्हापूर : प्रकाश आबिटकर तर सहपालकमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ

वर्धा : डॉ.पंकज भोयर

परभणी : श्रीमती मेघना बोर्डीकर

अंधाऱ्या ठिकाणी नेऊन 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

0

अंधाऱ्या ठिकाणी नेऊन 6 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार

बदलापूर पुन्हा हादरलं.!!!

अल्पवयीन मुलीवरच्या अत्याचाराने बदलापूर पुन्हा एकदा हादरलं आहे. बदलापूरमध्ये 6 वर्षांच्या मुलीसोबत गैरकृत्य करण्यात आलं आहे. बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याच परिसरात राहणाऱ्या एका 16 वर्षांच्या मुलाने अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य केलं आहे.

6 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खेळायच्या बहाण्याने मुलाने अंधार असलेल्या ठिकाणी नेलं आणि तिच्यासोबत गैरकृत्य केलं. मुलगी शाळेच्या वेळेत शाळेत जायचं नाही, असं घाबरून आईला सांगत होती, मात्र मुलगी असं का करत आहे? असा संशय आईला आला. अखेर आईने विश्वासात घेऊन मुलीला विचारलं, तेव्हा तिने घडलेला प्रकार सांगितला.

मुलीने झालेला सगळा प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी थेट बदलापूर पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली. यानंतर बदलापूर पोलिसांनी संवेदनशील घटनेचं गांभीर्य ओळखून तात्काळ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन त्याला भिवंडीच्या बाल न्यायालयात हजर करण्यात आलं. या घटनेनंतर बदलापूरमध्ये खळबळ माजली आहे.

बदलापूर पुन्हा हादरलं….

याआधी बदलापूरच्या शाळेमध्ये अल्पवयीन मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केले होते, या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाचं वातावरण होतं. या अत्याचाराविरोधात बदलापूरकर रस्त्यावर उतरले आणि त्यांनी दिवसभर रेल रोको आंदोलन केलं. पोलिसांच्या जीपमधून जात असतानाच अक्षय शिंदेने पोलिसांकडे असलेली बंदूक खेचून घेतली आणि गोळीबाराला सुरूवात केली, यामध्ये अक्षय शिंदेचं एन्काऊंटर करण्यात आलं होतं.

गोंडगाव विदयालयाचा शासकीय चिञकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल.

0

गोंडगाव विदयालयाचा शासकीय चिञकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल.

भडगाव प्रतिनिधी:-

चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत गोंडगाव माध्यमिक विदयालयातील शासकीय चिञकलेच्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ईलीमिंटरी परीक्षेला ९ विदयार्थी बी. व सी. ग्रेड मिळवुन उत्तीर्ण झाले. तर इंटरमिजीएट परीक्षेला २८ विदयार्थी बी. व सी. ग्रेड मिळवुन उत्तीर्ण झाले. असे एकुण ३७ विदयार्थ्यांनी या शासकीय परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

या विदयार्थ्यांना विदयालयातील कलाशिक्षक पी. व्ही. जाधव यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वि विदयार्थ्यांचे विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, जेष्ट शिक्षक सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस. आर. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस. आम्ले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे, ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आदिंनी यशस्वि विदयार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

मुंबई केंद्रातून इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स प्रथम

0

मुंबई केंद्रातून इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स प्रथम

६३ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत मुंबई केंद्रातून मोरया प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेच्या इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच बृहन्मुंबई पोलीस कल्याण निधी, मुंबई या संस्थेच्या इन्शाअल्ला या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी आज (१६ जानेवारी) एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे मुंबई केंद्रावरील अन्य निकाल पुढीलप्रमाणे-

प्रवेश कला क्रीडा मंच या संस्थेच्या तुझ्या रुपात मी…या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन: प्रथम पारितोषिक महेंद्र दिवेकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक सुशील इनामदार (नाटक- इन्शाअल्ला), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक प्रसन्न निकम (नाटक- इन्शाअल्ला), द्वितीय पारितोषिक – श्याम चव्हाण (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), नेपथ्य : प्रथम पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक-इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), द्वितीय पारितोषिक रजनिश कोंडविलकर (नाटक- कायाप्पाचा पाडा), रंगभूषा : प्रथम पारितोषिक राजेश चव्हाण (नाटक- मी तर बुआ अर्धा शहाणा), द्वितीय पारितोषिक अनिल कासकर (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक सुशील इनामदार (नाटक -इन्शाअल्ला) व समृध्दी कोटगी (नाटक- इम्युनिटी-द व्हाईस ऑफ टॉलरन्स), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे अक्षता सुर्वे (नाटक- इन्शाअल्ला), शांती बावकर (नाटक- तुझ्या रुपात मी…), अपूर्वा बावकर (नाटक- घर त्या तिघांचं), अमिषा घाग (नाटक- तुझ्या रुपात मी…), अंकिता आग्रे (नाटक- संघर्ष जगण्याचा – लक्षवेध एकलव्याच्या ध्येयपूर्तीचा), सुशील पवार (नाटक- तुझ्या रुपात मी…), हेमंत घाटगे (नाटक- इम्युनिटी द व्हाईस ऑफ टॉलरन्स), आत्माराम धर्णे (नाटक- धुमशान), प्रणय भुवड (नाटक-मोक्ष), श्वेत बगाडे (नाटक-द हंग्री क्रो).

 

२३ डिसेंबर, २०२४ ते १४ जानेवारी, २०२५ या कालावधीत साहित्य संघ मंदिर, गिरगाव, मुंबई येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण १९ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून रमाकांत भालेराव, विवेक खेर आणि प्रतिभा तेटु यांनी काम पाहिले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषिक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मुंबई केंद्राचे समन्वयक म्हणून राकेश तळगावकर आणि प्रियांका फणसोपकर यांनी काम पाहिले.

कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पुलाचे काम पुर्ण करावे.भडगाव शेतकरी संघटनेचे सा. बां. विभागाला निवेदन.!!!

0

कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पुलाचे काम पुर्ण करावे.भडगाव शेतकरी संघटनेचे सा. बां. विभागाला निवेदन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम वेळेवर पुर्ण करण्याबाबत महाराष्टृ शेतकरी संघटना भडगाव तालुका मार्फत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, एरंडोल, पारोळा, भडगाव मतदार संघाचे आमदार अमोल पाटील, पाचोरा, भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर पाटील, गणेश पाटील उपविभागीय अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव, शितल सोलाट तहसिलदार भडगाव आदिंना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे कि, कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम अपुर्ण अवस्थेत आहे. व हे काम सध्या बंद आहे. या पुलाचे काम अपुर्ण असल्यामुळे पाटाला ३ ते ४ दिवस उशीराने पाणी सोडण्यात आलेले आहे. पाटाला पाणी उशीरा सोडल्याने शेतकर्यांचे पिकांच्या होणार्या नुकसानीस सार्वजनिक बांधकाम विभागाची कार्यकारी अभियंता तसेच उपविभागीय अधिकारी व पुलाचे काम करणारा संबंधीत ठेकेदार यास जबाबदार राहील. तसेच त्यांचेकडुन शेतकर्यांची झालेल्या नुकसानीची भरपाई घेतली जाईल.

तरी कजगाव ते पारोळा रस्त्यावरील पाटचारी नं. १७ जवळील पुलाचे काम लवकरात लवकर करुन शेतकर्यांचे हिताचा विचार करावा.असेही शेवटी या निवेदनात म्हटलेले आहे. या निवेदनावर महाराष्टृ शेतकरी संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष अभिमन हाटकर, तालुका संपर्क प्रमुख भगवान चौधरी, खजिनदार मनोज परदेशी, उपाध्यक्ष शांताराम आचारी, कार्याध्यक्ष अनिल पाटील, अशोक भदाणे, कन्हैय्यालाल महाजन, सदस्य सुनिल पाटील, सुभाष ठाकरे, मनोज महाजन, लक्ष्मण पाटील, तालुका युवा अध्यक्ष उमेश धनगर, चेतन पवार, सल्लागार विजय पाटील आदि पदाधिकार्यांच्या सहया आहेत.

वाडे विदयालयाच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा नागद येथे स्नेह मेळावा.

0

वाडे विदयालयाच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा नागद येथे स्नेह मेळावा.

बालपणातील मिञांची.३३ वर्षांनी भरली पुन्हा शाळा.आठवणींना मिळाला उजाळा.!!!!

भडगाव प्रतिनिधी :—

चाळीसगाव येथील रा.स. शि. प्र. मंडळ संचलीत वाडे येथील माध्यमिक विदयालयातील सन १९९२, १९९३ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता. हा स्नेह मेळावा नागद वडगाव जि. संभाजीनगर येथील वृक्षमित्र कृषी पर्यटन केंद्र येथे मोठया उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य एस. एस. पाटील हे होते. तब्बल ३३ वर्षांनी शाळेतील बालपणीच्या मिञ, मैञिणींची अनोखी शाळा आपल्या गुरुजनांच्या उपस्थित पुन्हा भरल्यामुळे माजी विदयार्थ्यांच्या चेहर्यावर हास्य फुलल्याचे दिसुन आले. भेट झाल्यामुळे सर्व विद्यार्थी एकमेकांची कुतूहलाने विचारपूस करत हा मेळावा अतिशय आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व मिञ, मैञिणींच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना भगवे फेटे बांधण्यात आले. यावेळी गुरुजनांवर पुष्पवृष्टी करून सर्व गुरुजनांचे संगीताच्या तालावर पुष्पवृष्टी करून अनोखे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन एन. सी .माळी , पी. के .मोरे , डी .ए .मोरे, व्ही. पी .पाखले ,ए.सी.अहिरराव रमेश महाले, जिजाबाई महाले ,शिवाजी पाटील , अशोक परदेशी आदि गुरुजनवर्ग उपस्थित होते.

सर्व विद्यार्थ्यांनी ब्रीदवाक्य बनवले होते. एकच मनस्थिती शंभर टक्के उपस्थिती त्यानुसार शंभर टक्के उपस्थिती दर्शवुन सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी स्नेह मेळाव्यासाठी सुरत ,पुणे ,नाशिक , छत्रपती संभाजीनगर असा दुरवर प्रवास करून हजर झाले. राम गोसावी यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये वैभव महाजन, श्रावण कोळी , योगेश पाटील ,जालींदर चित्ते, रवी पाटील ,प्रवीण माळी , सुनील माळी , राजु परदेशी, राजेश वाघ,अर्जुन माळी, हिरामण पाटील, रवी मोरे, गोकुळ सोनवणे रत्ना चौधरी, सुरेखा माळी ,वर्षा परदेशी ,ज्योती पाटील ,मीनाक्षी माळी ,आशा माळी ,मनिषा पाटील ,राधा कोळी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सकाळी ९ वाजेपासुन ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्व मित्र मैत्रिणी हे जुन्या आठवणींच्या गप्पांमध्ये रंगुन गेले होते. शिक्षक व्हि. पी. पाखले, पि. के. मोरे व , रमेश महाले, जिजाबाई महाले, अशोक परदेशी यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत व यशस्वी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले.

तसेच अध्यक्षिय भाषणातुन एस. एस. पाटील यांनी बालपणातील शाळेतील विदयार्थ्यांनी आज विविध क्षेञात चांगली प्रगती केली आहे. याचा आनंद आहे. असे विविध अनुभव मांडत एस. एस. पाटील यांनी हास्याचे फवारे उडवित जीवन जगतांना हसत हसत जीवन जगा असा संदेशही दिला. कार्यक्रमाचे काव्यमय रित्या सुत्रसंचालन सुधाकर पाटील यांनी केले. व आभार डॉ. सुरेश पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले. विदयार्थ्यांनी या निसर्गरम्य वातावरणात बोटींगमध्ये बसुन आनंद लुटला.

लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार.?

0

लाडक्या बहि‍णींचा जानेवारीचा हप्ता कधी येणार.?

महत्त्वाची अपडेट आली समोर

 

महायुती सरकारने सुरु केलेल्या लाडकी बहिण योजनेची कायम चर्चा होते. याच योजनेमुळे महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले, असेही बोलले जातेय. डिसेंबर महिन्यांपर्यंत या योजनेचा लाभ दोन कोटींहून अधिक महिलांनी घेतला.

आत्तापर्यंत सर्व हप्ते वेळेवर आले. मात्र आता जानेवारीचे १५ दिवस संपल्यानंतर जानेवारीचा हप्ता कधी येणार, हा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.

आत्तापर्यंत किती हप्ते आले.?

महायुती सरकारने जुलै २०२४ ला या योजनेची घोषणा केली होती. जुलैपासून डिसेंबर २०२४ पर्यंत प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे ९ हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहे. राज्यातील सुमारे सव्वा दोन कोटी महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे शासकीय आकडेवारीतून समोर आले आहे. आता या महिन्यात म्हणजेच जानेवारीत येणारा हप्ता हा सातवा हप्ता असेल. मात्र अजून या हप्त्याबाबत माहिती समोर आलेली नाही.

कधी येणार जानेवारीचा हप्ता.?

जानेवारी महिन्यात येणारा सातवा हप्ता कदाचित २६ जानेवारीनंतर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मंत्री अदिती तटकरे यांनी ज्या महिल्या लाभार्थ्यांबाबत तक्रारी आल्या आहेत, त्यांचे अर्ज तपासणी करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जानेवारीत काही महिला लाभार्थी कमी होतील, असेही सांगितले जात आहे. पात्र महिलांच्या खात्यात २६ जानेवारीनंतर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, असेही बोलले जात आहे.

२१०० रुपये कधी मिळणार.?

विधानसभेच्या घोषणापत्रात महायुती सरकारने महिलांना मिळणाऱ्या दीड हजारांचा हप्ता २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर महिलांना २१०० रुपये कधी मिळणार या चर्चा सुरु झाल्या. मात्र मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना २१०० रुपये नक्की मिळतील, असे पुन्हा एकदा सांगितले होते. मात्र महिलांना २१०० रुपये मिळण्यासाठी मार्चपर्यंत वाट पहावी लागेल, असेही सांगितले जात आहे.

error: Content is protected !!