Tuesday, January 20, 2026
Google search engine
Homeमहाराष्ट्रबालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ “अभ्युदयनगरचा गणराज” यांच्या वतीने, के.ई.एम. रुग्णालयाच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला स्थानिक समाजाकडून अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात एकूण १९५ रक्तदात्यांनी यशस्वीरीत्या रक्तदान केले. काही रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला, परंतु वैद्यकीय कारणास्तव रक्तदान करता आले नाही, तरी त्यांचे योगदानही मनःपूर्वक मानले गेले. मंडळाने या सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक जाहीर आभार व्यक्त केले.

सदरहू रक्तदान शिबिरात शिवसेना (ठाकरे) दादरचे आमदार महेश सावंत, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीरभाऊ साळवी, नव निर्वाचित नगरसेवक/नगरसेविका सुप्रिया दळवी, तसेच सचिन पडवळ, किरण तावडे, भारती पेडणेकर उपस्थित राहून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचा गौरव केला.

रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोसकर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, विश्वस्त मंगेश नागांवकर, तसेच सचिन फाळके, मयुर दिवेकर, मनिष साळकर, अनिल आगरे आणि सर्व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वी झाले व स्थानिक समाजात रक्तदानाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

या शिबिरामुळे फक्त रुग्णालयासाठी जीवनदान पुरवले गेले नाही, तर समाजात मानवतेची जाणीव आणि सामाजिक जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण झाली. बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे हे उपक्रम नेहमीच समाजस्नेही, प्रेरणादायी आणि उदात्त स्वरूपाचे असतात, अशी उपस्थितांनी मनःपूर्वक नोंद केली.

अबरार मिर्झा
अबरार मिर्झाhttps://maharashtardiary.in
मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!