Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 105

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचा महिलेवर बलात्कार, मुंबईतील मानखुर्द येथील घटना.!!!

0

चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाचा महिलेवर बलात्कार, मुंबईतील मानखुर्द येथील घटना.!!!

मुंबई :-

मुंबईतील मानखुर्द परिसरात अल्पवयीन मुलाने चाकूचा धाक दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (१३ जानेवारी २०२४) संध्याकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

घटनेच्या दिवशी पीडित महिला आपल्या दोन मुलांसह घरी एकटीच होती. त्याचाच गैरफायदा घेत आरोपीने तिच्या घरात शिरून तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. गृहिणी असलेली पीडित महिला तिच्या दोन मुलांसह आपल्या घरात बसली होती, तर तिचा पती कामावर होता. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवणारा आरोपी तिच्या मागे घरात शिरला आणि त्याने आतून दरवाजा बंद केला. त्यानंतर आरोपीने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला आणि घटनास्थळावरून पळून गेला. पीडित महिलेचा मदतीसाठी ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धावत जाऊन दार उघडले आणि तिच्या पतीला आणि पोलिसांना कळवले. तिच्या जबाबावरून मानखुर्द पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर आरोपी फरार झाला. रात्रभर शोध घेतल्यानंतर मंगळवारी दुपारी त्याला ताब्यात घेण्यात आले. आरोपी अल्पवयीन आहे की नाही, याची पुष्टी करण्यासाठी पोलिस त्याच्या जन्म प्रमाणपत्राची आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करत आहेत. वय पडताळणीच्या निकालांवरून पुढील कारवाई निश्चित केली जाईल, असे मानखुर्द पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.

 

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बलात्काराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या आहेत. दरम्यान, २०१७ मध्ये राज्यात एकूण ४ हजार ३२० बलात्काराच्या घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ४ हजार ९७४ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. तर, २०१९- ५ हजार ४१२ घटना, २०२० मध्ये ४ हजार ८४६ घटना, २०२१- ५ हजार ९५४ घटना, २०२२ मध्ये ७ हजार ८४ आणि २०२३ मध्ये ७ हजार ५२१ घटना घडल्या आहेत. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या संख्येत वाढ होत असून राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होत आहे.

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार 25 हजार रुपये देणार; नितीन गडकरींची घोषणा.!!!

0

अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपये देणार नितीन गडकरींची घोषणा.!!!

 

नागपूर प्रतिनिधी :-

 

नागपूरमधील एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी एक मोठी घोषणा केली आहे. रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींना 25 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

सध्या अशा व्यक्तींना दिल्या जाणाऱ्या बक्षिसापेक्षा ही रक्कम पाच पटीने अधिक आहे.

नेमकं काय म्हणाले गडकरी.?

नितीन गडकरींनी या नव्या धोरणाबद्दल बोलताना, सध्या अपघातग्रस्त लोकांच्या मदतीसाठी पुढे येणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस दिलं जातं. मात्र अपघातानंतरच्या पहिल्या तासाभरात जखमींना रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना अधिक बक्षिस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर पहिल्या सात दिवसांमध्ये जे उपचार केले जातील त्याचा खर्च सरकार करणार आहे. यासाठीही मर्यादा दीड लाखांपर्यंत असून दीड लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जाणार आहेत. गडकरींनी या कार्यक्रमात बोलताना, “केवळ राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांमध्ये जखमी झालेल्यांसाठी ही योजना नाही तर राज्य महामार्गांवर अपघातात जखमी झालेल्यांनाही आर्थिक मदत केली जाणार आहे,” अशी माहिती दिली.

लागू केलं नवं धोरण….

अपघाग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी ऑक्टोबर 2021 पासून रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून नवीन धोरण लागू करण्यात आलं आहे. भीषण अपघातामधील जखमींना तातडीची मदत करुन त्यांचे प्राण वाचवणाऱ्यांना, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणाऱ्यांना या योजनेअंतर्गत बक्षीस स्वरुपात ठराविक निधी दिला जाणार असं निश्चित करण्यात आलेलं. तेव्हा ही रक्कम 5 हजार रुपये इतकी होती. ज्यामध्ये आता वाढ करुन ती 25 हजार इतकी करण्यात आली आहे.

कोण असतो ‘गुड स्मार्टीयन.?

केंद्र सरकारच्या या मदतनीसांना आर्थिक स्वरुपाची शब्बासकीची थाप देण्याच्या योजनेला ‘गुड स्मार्टीयन’ असं नाव देण्यात आलं आहे. “चांगल्या विचाराने आणि कोणत्याही मोबदल्याचा अथवा बक्षिसाचा विचार न करता, कोणतंही खास नातं नसताना स्वयंप्रेरणेनं पुढाकार घेत अपघातात जमखी झालेल्यांना मदत करतो,” अशी ‘गुड स्मार्टीयन’ची व्याख्या करण्यात आली आहे.

चार गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या

दरम्यान, सोनमर्गमधील झेड-मोर्च बोगद्याच्या कामाच्या भूमीपुजन सोहळ्यानंतर नितीन गडकरींनी, “आपल्या देशाला प्रगत राष्ट्र बनवण्यासाठी आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करायला हवी. पाणी, ऊर्जा, परिवहन आणि संवाद या गोष्टींशिवाय विकास, उद्योग, पर्यटन आणि व्यापार वाढवता येणार नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी आमच्याकडे जम्मू-काश्मीरला अधिक सधन, श्रीमंत आणि विकसित करण्यासाठी हा प्रकल्प सोपावला आहे. उद्योजक आणि व्यवसायिकांनी जम्मू-काश्मीरला अधिक आनंदी, सधन आणि श्रीमंत बनवायला हवं, असा आमचा उद्देश आहे. म्हणूनच आम्ही ही विकासकामं हाती घेतली आहेत,” असं सांगितलं.

गिरणा नदीपात्रात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू.!!!

0

गिरणा नदीपात्रात पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू.!!!

 

पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी दिला तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन 

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील वडजी येथील गिरणा नदीपात्रात विषेशत: पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीजवळ मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देऊन ही उपसा थांबत नसल्याने वडजी येथील पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी तहसीलदार शितल सोलाट यांना निवेदन देत 26 जानेवारीपासून गावातील गिरणा पात्रात उपोषणाचा इशारा दिला आहे.

 

वडजी हद्दीत गिरणा नदि पात्रातुन मोठ्याप्रणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. वाळूचोर हे तेथे असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या जवळून वाळू उपसा करत आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार निवेदन दिले आहे. मात्र तरीही हा वाळू उपसा बंद होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र आहे.

 

….तर पाणीटंचाईचे संकट!

 

वडजी येथे गिरणा नदिवर वडजी, रोकडा फार्म, पळासेडे-रुपनगर, वडगाव-नालबंदी, महीदंळे या गावाच्या पाणीपुरवठा योजना आहेत. सततच्या वाळू उपशामुळे या सर्व गावांना आगामी काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकते. वाळूचोरांची विहीरींना खेटून वाळू उपसा सुरू केला आहे. तर या भागातील शेती ज्या गिरणा नदिवर अवलंबून आहे. ती ही धोक्यात येण्याचे चिन्ह आहेत.

 

तहसीलदारांनी दखल घेत वडजीत धडक

काल दुपारी पत्रकार सुधाकर पाटील, उपसरपंच स्वदेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य दिनेश परदेशी यांनी वडजी गावाच्या हद्दीतून वाळू उपसा बंद होत नसल्याने त्याविरोधात 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून गिरणा नदि पात्रात उपोषणाचा निवेदनाव्दारे इशारा दिला. तहसीलदार शितल सोलाट यांनी तत्काळ दखल घेत वडजी गावाला भेट देत अवैध वाळू वाहतुकीचा आढावा घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात त्यांनी सरपंच मनिषा गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. त्यात त्यांनी ग्रामपंचायतीसह,

स्थानिक प्रशासनाला सुचना केल्या. तर गावातील नागरीकांनी वाळूचोरी करू नये असे अहवान केले. येथील वाळूचोरीला पायबंद घालण्याबाबत उपस्थितांना अश्वस्त केले. यावेळी ग्रामस्थांनी वाळूचोरीबाबत तक्रारी मांडल्या. तर तत्काळ वाळूचोरीला आळा घालण्याची मागणी केली.

चौकट

26 जानेवारीपासून उपोषण

दरम्यान वडजी गावाच्या हद्दीतून होत असलेल्या अवैध वाळू उपशाला पायबंद घातला नाही तर 26 जानेवारीत पासून गिरणा नदिपात्रात सुधाकर पाटील, स्वदेश पाटील, दिनेश परदेशी हे उपोषणाला बसणार आहे. काल तहसीलदार शितल सोलाट यांनी ग्रामपंचायतीत घेतलेल्या बैठकीत ही हे त्यांनी स्पष्ट केले. या वाळू उपशामुळे तरूणांमधे व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढत आहेत. शिवाय शेती आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ याबाबत पाऊले उचलावीत अशी मागणी होत आहे.

आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सज्ज रहा- आ. किशोरआप्पा पाटील

0

आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सज्ज रहा- आ. किशोरआप्पा पाटील

भडगाव प्रतिनिधी :-

शहर तसेच भडगाव तालुका प्रमुख पदाधिकारी यांची माननीय कार्यसम्राट भूमिपुत्र आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्वाची बैठक पार पडली व गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कौतुक केले तसेच आमदार साहेब यांनी येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या नगरपालिका तसेच

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी पुन्हा एकदा शिवसेना – युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोराने कामाला लागावे तसेच मार्गदर्शन केले तसेच आदेश देण्यात आले त्या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रकाश अमृत पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भैय्या साहेब पाटील, समन्वय समिती अध्यक्ष युवराज आबा पाटील, शिवसेना प्रवक्ते प्रदीप देसले, शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील, शिवसेना शहरप्रमुख आबा चौधरी, शिवसेना शहर प्रमुख बबलू देवरे , युवासेना जिल्हा संपर्कप्रमुख दिलीप भोई, युवासेना जिल्हा सचिव विनोद मोरे युवासेना उपजिल्हाप्रमुख दुर्गेश वाघ, युवासेना नीलेश पाटील, युवासेना महेंद्र ततार ,तसेच सर्व माजी नगरसेवक, माजी जि.प सदस्य, पंचायत समिती सदस्य शेतकी संघ संचालक तसेच शहरातील तसेच ग्रामीण भागातील शिवसेना- युवासेना प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा.!!!

0

सहकार विभागाशी निगडीत सर्व संस्थांचा कारभार पादर्शक असावा.!!!

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील.

महाराष्ट्र डायरी न्युज करिता सातारा जिल्हा प्रतिनिधी श्री.राहुल गावडे पाटील

सातारा : सहकार विभागाशी निगडीत असलेल्या सर्व संस्थांचा कारभार हा पादर्शक असला पाहिजे, अशी शासनाची अपेक्षा आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी व संस्थेत काम करणाऱ्यांना न्याय दिला पाहिजे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.

 

कोरेगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचे भूमीपूजन मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी आमदार रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पांडूरंग भोसेले, उपसभापती दिलीपराव अहिरेकर, जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक, कोरेगावच्या सहायक निबंधक प्रिया काळे आदी उपस्थित होते.

 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी उत्पन्नाचे विविध स्त्रोतांचा अभ्यास करुन उत्पन्न वाढविले पाहिजे, असे सांगून मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील म्हणाले, कोरेगाव बाजार समितीला एकूण साडेनाऊ एकर जागा आहे. ही जागा मोठी असून याचा चांगल्या पद्धतीने उपयोग केला पाहिजे. ही बाजार समिती आता 75 वर्षात पदार्पण करणार आहे. कोरेगाव खरेदी विक्री संघाचेही काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. या दोन्ही संस्थाना प्रामाणिकपणे सहकार्य करण्याची भूमिका राहील, असेही त्यांनी सांगितले.

 

कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी आपले उत्पन्न वाढविणे ही काळाजी गरज बनली आहे. यासाठी नवनवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत. तसेच सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत, असे आमदार श्री. निंबाळकर यांनी यावेळी सांगितले.

 

कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उभारण्यात येणारे व्यापारी संकुल कोरेगावच्या वैभवात भर घालेल. या व्यापारी संकुलाचा शेतकरी, व्यापारी यांना नक्की फायदा होईल. या संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताची कामे केली जातील. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उत्पन्नाचे विविध स्त्रोत उपलब्ध करण्यात येतील, असे आमदार श्री. शिंदे यांनी कार्यक्रमाप्रसंगी सांगितले.

 

या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

टेकवाडे खुर्द येथील माजी पोलीस रविंद्र पाटील शेती मातीची सेवा अन भगवंताची नित्याने करताहेत भक्ती असाही आदर्श.!!!

0

टेकवाडे खुर्द येथील माजी पोलीस रविंद्र पाटील शेती मातीची सेवा अन भगवंताची नित्याने करताहेत भक्ती असाही आदर्श.!!!

भडगाव प्रतिनिधी :—

येथुन जवळच असलेल्या टेकवाडे खुर्द ता. चाळीसगाव येथील शेतकरी रविंद्र गोविंदा पाटील वय ५५ वर्ष यांनी केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये ३ वर्ष नोकरी केली. पोलीसाची नोकरी सोडुन त्यांनी शेती मातेची सेवा करण्याचा निर्णय घेतला.

 

दिवसभर शेतात कष्ट करुन ते चांगले उत्पन्न मिळवत संसाराचा रहाटगाडगा चालवित आहेत. एवढेच नव्हे तर ते दररोज साडेतीन वाजेच्या सुमारास झोपेतुन उठतात. अंघोळ करुन गावातील श्रीराम मंदिर व श्री. हनुमानाचे मंदिर अशा दोघा मंदिरांच्या परीसराची स्वच्छता करतात. पुजापाठ करतात. दररोज सकाळी श्रीराम मंदिरात घंटा वाजतात. व स्पिकरवर पावणेपाच ते साडेपाच पर्यंत संपुर्ण काकडा करतात. नंतर काकडा आरती म्हणतात. महादेवाची आरती म्हणतात. त्यामुळे गिरणा काठालगतच्या टेकवाडे खुर्द, बहाळ कसबे, बहाळ रथाचे या गावांमध्ये सकाळच्या प्रहरी भगवंताच्या नामस्मरणाने भक्तीमय वातावरण निर्माण होते. यामुळे सकाळी नित्याने परीसरातील भाविकांना भक्तीची गोडी लागत आहे. विशेष म्हणजे मंदिरात ते दररोज एकटेच उपस्थित असतात. अशी ही दिनचर्या त्यांची नित्याने जवळपास १६ ते १७ वर्षापासुन सुरु आहे.शेती मातेची सेवा केल्यास कष्टाचे फळ मिळतेच.

तर भगवंताची सेवा मनोभावे केली तर भक्तीमार्गातुन आत्मीक समाधान मिळते. सुखी, आरोग्यदायी जीवन जगण्याचा आनंद मिळतो. अशा या टेकवाडे खुर्द येथील रविंद्र पाटील या शेतकर्याच्या नित्यक्रमाचे , कार्याचे कौतुक होत आहे. शेती मातेची सेवा करा. भगवंताची भक्ती करा. भगवंत आपल्याला चांगलेच फळ देईल. आपली प्रगतीच होईल. असा संदेशही रविंद्र पाटील यांनी दिला आहे.

 

याबाबत माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील टेकवाडे खुर्द येथील रहिवाशी आणि येथुन जवळच असलेल्या वाडे येथील माध्यमिक विदयालयाचा माजी विदयार्थी रविंद्र गोविंदा पाटील वय ५५ वर्ष यांना लहानपणापासुनच शेती मातीत काम करण्याची आवड होती. त्यांनी वाडे विदयालयात दहावीचे शिक्षण सन १९८५, १९८६ ला पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ काॅलेजमध्ये बी. ए. शिक्षण पुर्ण केले. उंच अन भरदार शरीर असा त्यांचा रुबाब होता. पोलीस भर्तीसाठी त्यांनी सराव केला. आणि रविंद्र पाटील हे १९८८ मध्ये धुळे येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये भरती झाले. त्यांनी १ वर्षासाठी कन्याकुमारीतील ( पल्लीकुरम ) येथे ट्रेनिंग पुर्ण केले. तेथुन ते पुणे येथे तळेगाव दाभाडे येथे केंद्रीय रिझर्व पोलीस फोर्समध्ये १९८८, १९८९ मध्ये पोलीस हवालदार म्हणुन नोकरीला लागले. पोलीस हवालदाराची त्यांनी ३ वर्ष सेवा केली. माञ तेथील काहीसे वातावरण त्यांना पसंत पडले नाही. त्यात टेकवाडे खुर्द गावी बागायती शेती पाहण्यासाठी कुणी नसल्याने त्यांनी पोलीस हवालदाराच्या नोकरीला रामराम केला. आणि शेती व्यवसाय करण्यासाठी त्यांनी गावी परतीचा पल्ला गाठला. रविंद्र पाटील हे ४ भाऊ आहेत. ते टेकवाडे खुर्द येथील माजी सरपंच वाल्मिक गोविंदा पाटील यांचे लहान बंधु आहेत. हे कुटुंब कष्टाळु असुन बागायती शेतीचे चांगले उत्पन्न काढतात. रविंद्र पाटील यांचे वाटयाला ७ एकर जमिन असुन तेही केळी पिकाचे चांगले दर्जेदार उत्पन्न काढतात. शेती मातीत कष्ट करुन संसाराचा रहाटगाडगा चालवित आहेत.त्यांना शेती मातीची सेवा करण्यासोबतच लहान पणापासुन देवाची सेवा करण्याची मोठी आवड होती.

गावातील श्रीराम मंदिरात व श्री. हनुमान मंदिर परीसरात दररोज सकाळी साडेतीन वाजेच्या सुमारास झोपेतुन उठुन अंघोळ करुन या दोघ मंदिर परीसरात नियमित स्वच्छता करतात. पुजा पाठ करतात. सकाळी ४ वाजता श्रीराम मंदिरात नित्याने घंटा वाजवतात. व स्पिकरवर पावणेपाच ते साडेपाच वाजेपर्यंत संपुर्ण काकडा करतात. नंतर ते काकडा आरती, महादेवाची आरती म्हणतात. विशेष म्हणजे ते दररोज एकटेच असतात. सकाळच्या प्रहरी गिरणा नदीच्या काठी टेकवाडे खुर्द, बहाळ कसबे, बहाळ रथाचे यासह गावांना दररोज भगवंताच्या नामस्मरणाने भक्तीमय वातावरण निर्माण होते. भक्तीचा सुगंध दरवळत परीसरातील भाविकांना दररोज सकाळी नित्याने भगवंताच्या नामस्मरणाचा धार्मिकतेचा बोलबाला कानी पडत असतो. रविंद्र पाटील यांचा हा धार्मिकतेचा स्तुत्य कार्यक्रम नित्याचाच ठरत आहे. सकाळच्या प्रहरी या भगवंताच्या नामस्मरणाची परीसरातील भाविक, नागरीकांना दररोजची आतुरता असते. शेती मातीची सेवा अन भगवंताचे नामस्मरण केल्याचा आनंद अन समाधान असल्याचेही रविंद्र पाटील यांनी बोलतांना सांगीतले.

बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.!!!

0

बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन.!!!

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अभ्युदयनगर येथील बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाने केईएम हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, जे रविवार, १९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९:०० ते दुपारी ३:०० वाजेपर्यंत गणराज सभागृह, इमारत क्र.१६ च्या बाजूला, अभ्युदय नगर, काळाचौकी, मुंबई-४०००३३, येथे आयोजित केले जाईल.

 

रक्तदान शिबिराचे उद्दिष्ट गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी इच्छुक रक्तदात्यांकडून रक्त संकलन करणे आहे. रक्तदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, यशस्वीरित्या रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला २४ इंची ट्रॅव्हल बॅग ही आकर्षक भेट दिली जाईल. रक्तदान शिबिराचे आयोजक जनतेला मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आणि कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. हे शिबिर म्हणजे एका उदात्त कार्यात योगदान देण्याची आणि जीव वाचवण्याची सर्वोत्कृष्ट संधी आहे.

 

“आम्ही सर्वांना पुढे येऊन गरजूंना मदत करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन करतो,” असे बालगोपाल सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचे प्रवक्ते म्हणाले. “प्रत्येक रक्तदान तीन जीव वाचवू शकते आणि आम्हाला आशा आहे की आमचे शिबिर लोकांना समाजाचे ऋण परतफेड करण्यास प्रेरित करेल. आम्ही सर्व रक्तदात्यांना रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आणि ते यशस्वी करण्याचे आवाहन करतो. तुमचे योगदान अनमोल जीव वाचवण्यास आणि समाजमनावर सकारात्मक परिणाम करण्यास मदत करू शकते.”

धाराशिव जिल्हयात ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन संपन्न.!!!

0

धाराशिव जिल्हयात ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन संपन्न.!!!

 

धाराशिव (गुरुदत्त वाकदेकर) : माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान व कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग, यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री कविता पुदाले यांच्या संकल्पनेतून ‘आई’ एक दिवसीय साहित्य संमेलन थाटात संपन्न झाले. संमेलनाचे हे चौथे वर्ष आहे.

 

कार्यक्रमाची सुरुवात कमल नलावडे यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. ग्रंथदिंडी डॉ. सुलभा देशमुख यांच्या शुभहस्ते ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पूजन झाले. यावेळी प्राचार्य. डॉ. सुभाष राठोड, प्रा . रणजित दांगट, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. हशमबेग मिर्झा, डॉ. दयानंद भोवाळ, डॉ. तुळशिराम दबडे, डॉ. दिपक जगदाळे, अधिक्षक धनंजय पाटील, शिवाजीराव घुगे अणदूर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

विद्यार्थ्यावर योग्य संस्कार होण्यासाठी प्रा. रणजित दांगट यांच्या ‘आई समजून घेताना’ या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी आई विषय अत्यंत अलवारपणे व जिव्हाळ्याने श्रोत्यांना समजावून सांगितला आणि असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असे म्हणून आयोजकांना धन्यवाद दिले. या परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुभाष राठोड यांनी “आमचे महाविद्यालय नेहमीच समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींच्या मदतीला सदैव तत्पर असेल असे आश्वासन दिले.”

 

सदर कार्यक्रमात प्रतिष्ठानतर्फे

कौटूंबिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या महिला सेवाव्रतींना ‘मातोश्री पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये डॉ. सुलभा दिलीप देशमुख, धाराशिव (माजी प्राचार्य), डॉ. रेखा अनिल ढगे, (कवयित्री) धारशिव, तृप्ती जगदिश काटकर, कोल्हापूर यांचा समावेश होता. तर सुरभी बी. के. (गीतकार) वडगांव सिध्देश्वर, धाराशिव यांना विशेष सन्मान देऊन गौरविण्यात आले.

 

सदर संमेलनात ‘आई’ विषयावर घेतलेले कवी संमेलन अतिशय रंगतदार झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवाजी गायकवाड होते. प्रमुख पाहूणे डॉ. रेखा ढगे आणि अरविंद हंगरगेकर होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. गायकवाड यांनी आपल्या कवितेतून आई विषय मांडला. गेल्या चार वर्षापासून चालू असलेल्या आई एक महाकाव्य व आई समजून घेतांना कार्यक्रमासाठी आयोजकांचे कौतूक केले व शुभेच्छा दिल्या.

 

कविसंमेलनामध्ये डॉ. मधुकर हुजरे, धाराशिव, नागोराव सोनकुसरे, नागपुर, रुपेशकुमार जावळे, सुरभी भोजने वडगांव (सिध्देश्वर), गणेश मगर वाघोली, बाळासाहेब मगर धाराशिव, महाविद्यालयीन विद्यार्थीनी शिवानी जगताप, स्नेहल जाधव, निकिता घुगे, निकिता जाधव, प्रज्ञा सुरवसे यांनी कविता सादर केल्या.

 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संतोष पवार आणि डॉ. सचिन देवव्दारे यांनी केले. तर आभार डॉ. तुळशिराम दबडे व डॉ. लक्ष्मण थिट्टे यांनी मानले.

 

आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या कल्पक कार्यक्रमाचे आयोजन रमेशराव पुदाले, सुनील उकंडे, कविता पुदाले, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. रुपेशकुमार जावळे, डॉ. सुभाष जोगदंडे, डॉ. डी. जी. जाधव, डॉ. एच. एम. मिर्झा, डॉ. पी. एस. गायकवाड, प्रा. अशिष हंगरगेकर, डॉ. संतोष पवार व सर्व सदस्य माऊली रुक्माई तुळसाई प्रतिष्ठान, नळदुर्ग यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्दु सुतार, सचिदानंद घुगे, भागीनाथ बनसोड, दतात्रय कांबळे, मधुकर माने, सचिन गायकवाड, भिमराव गवारे यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आलेल्या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपणदेखील करण्यात आले.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना भेट.!!!

0

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना भेट.!!!

पुणे :-

11 जानेवारी (हिं.स.)।डी.बी.टी मार्फत अनुदानाचे वाटप करणे शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा १५००/- रुपये अनुदान दिले जाते.

 

सदरचे अनुदान तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून NEFT/RTGS व्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. मात्र, आता थेट डीबीटीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत केले जाणार आहे.संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसिलकडून संबंधित बँकेत सर्व लाभाथ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे.

 

परंतु आता संगायो व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटीमार्फत मिळणार आहे. त्यासाठी संगायो निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आपला मोबाईल नंबर आधाराशी संलग्न असणे आवश्यक आहे. संगायो व श्रावणबाळ योजनतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात त्यांचेकडे ३१ जानेवारी २०२५ अखेर पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी.विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात तेथे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात येत आहे.

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

0

भडगाव येथील शाळेत डेरेदार वृक्षांची कत्तल करून बेकायदेशीर बांधकाम.?

 

वृक्षतोड व पक्षांचे जीव घेऊन बांधकामाला चालना देणाऱ्यांवर प्रशासन कारवाई केव्हा करणार.?

 

तिस वर्षांपासून टाळू वरचे लोणी खाणारे ते दोन “आका” कोण.?

 

विशेष प्रतिनिधी (किशोर रायसाकडा ):-

भडगाव शहरातील कोठली रस्त्यावतील शाळा हि दर सहा महिन्यात कुठल्या न कुठल्या विषयात चर्चेत राहते. यातच काही दिवसापूर्वी शाळेच्या परिसरातील पाच ते सहा डेरेदार हिरवेगार निंबाच्या झाडांची मुख्याध्यापकांनी कुठलीही पूर्व परवानगी न घेता हुकूमशाही पद्धतीने झाडांची कत्तल करून डेरेदार झाडांवर निवारा करणाऱ्या हजारो पक्षांना (बगळे व त्यांची छोटी पिल्ले व झाडावरील घरट्यातले शेकडो बगळ्यांची अंडी) मारले गेले होते. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांवर व शाळेवर गुन्हा दाखल करण्या पर्यंत विषय होता. पण त्या वेळी त्या तक्रारदारांचे व वन विभागाचे तोंड बंद करून तेरी भी चूप मेरी भी चुप करून प्रकरण गोलमाल कऱण्यात आले

 

असताना याच पाच सहा डेरेदार निंबाच्या झाडांच्या जागेवर शाळा तिस वर्षांपासून हुकूमशाही चालवणाऱ्या दोन आका ,संचालक मंडल व मुख्याध्यापकांनी बेकायदा,हमकायदा याठिकाणी गेल्या काही दिवसापासून मोठे बांधकाम सुरु केले आहे. हे करतांना त्यांनी जे डेरेदार निंबाचे वृक्ष कत्तल करून एका लाकूड व्यापार्याला देऊन टाळूवरचे लोणी खाऊन अनेक पक्षांना मारून टाकत. त्या ठिकाणीं नवीन कुठलेही झाडं न लावता अनाधिकृत बेकायदा बांधकामाला सुरुवात केली. या बांधकाम करण्या मागचा उद्देश काय? तसेच शाळेत कुणाला काही माहिती पडत नाही. तिस वर्षा पासुन परीसरात अनेक बांधकामे झाली ती अधिकृत आहेतः की अनाधिकृत तसेच शाळेची मेन बिल्डिंग तीन मजली आहे. त्या किती मजल्यांची परवानगी घेतली आहे. त्या समोर सभा मंडप (स्टेज) बांधण्यात आले त्याची परवानगी घेतली आहे का?त्याचे संपूर्ण टॅक्स हा नगरपालिकेला अदा केला आहे का ? अदा केला नसेल किंवा परवानगी घेतली नसेल तर प्रशासनाने या अवैध बांधकामावर करवाई करावी. व तिस वर्षांपासून हुकूमशाही पद्धतीने संस्था चालवणाऱ्या त्या दोन आका संचालक मंडल व मुख्याध्यापकांवर प्रशासनाने सरळ हाताने कारवाई करावी. अश्या हुकूमशाही पद्धत व बेकायदेशीर कामांना आळा घालावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

error: Content is protected !!