Tuesday, January 20, 2026
Google search engine
Home Blog Page 103

अप्पासाहेब श्री.जगनाथजी शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान संपन्न.!!!

0

अप्पासाहेब श्री.जगनाथजी शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त रक्तदान संपन्न.!!!

एरंडोल प्रतिनिधी :-

केमिस्ट.जिल्हा संघटनेच्या मार्गदर्शनाने केमिस्ट हृदय सम्राट आदरणीय अप्पासाहेब श्री. जगनाथजी शिंदे यांच्या 75 व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संपूर्ण राज्यभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.एरंडोल तालुका संघटनेनेही शबिराचे आयोजन करून सर्व केमिस्ट बंधूनी जास्तीत जास्त रक्तदात्यांकदुन रक्तदान करून अप्पासाहेबांचा वाढदिवस साजरा केला.

शिबिराचे ठिकाण आईहॉस्पिटल एरंडोल येथे होते.

एरंडोल येथे आज दि. 24/ 01/ 2025 रोजी मा आ श्री जगन्नाथजी शिंदे (आप्पासाहेब) कल्याण मेडिकल असोसियन चे महाराष्ट्र अध्यक्ष यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्र भर भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले.

एरंडोल येथील आई हॉस्पिटल येथे आज दि. 24/ 01/ 2025 रोजी सकाळी 10 वा रक्तदान शिबिराची सुरुवात झाली.संपूर्ण महाराष्ट्रभर अश्या रक्तदान शिबिराचे आयोजन करून मेडिकल असो.वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचे मानस घेऊन चालत आहेत.

लाडक्या बहीणींचे पैसे परत घेणार का.? अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर.!!!

0

लाडक्या बहीणींचे पैसे परत घेणार का.? अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर.!!!

 

लाडकी बहीण योजनेची स्क्रूटिनी सुरू झाली असून अपात्र महिलांकडून पैसे परत घेतले जाणार असल्याचे सांगितले जात होते. यावरून महायुती सरकारला विरोधकांनी चांगलेच घेरले होते. महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे यांनी काही महिला स्वत:हून पैसे परत करत आहेत.

त्यांचे पैसे सरकारी तिजोरीत जमा करण्यात येतीलअसे म्हटले होते. तटकरे यांच्या या विधानामुळे अधिकच संभ्रम निर्माण झाला होता.

 

मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. अपात्र लाभार्थी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार का? याचे पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. त्यामुळे या राज्यातील सर्वच लाडक्या बहि‍णींना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील काही काळापासून लाडक्या बहि‍णींचे पैसे परत घेतले जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकावर टीकेची झोड उठली होती. विरोधकांनी सरकारला चांगलच धारेवर धरलं होतं.

अजित पवार यांनी केलं स्पष्ट

पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला हवा. मात्र योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत ज्या महिलांना लाभ मिळाला आहे. त्यांच्याकडून पैसे परत घेणार नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. लाडक्या बहिणींकडून पैशाची रिकव्हरी करणार नाही, असे एका वाक्यात उत्तर अजित पवारांनी दिले.

रजनीताई देशमुख महाविद्यालय.एन ई पी 2020 कार्यक्रम आयोजन.!!!

0

रजनीताई देशमुख महाविद्यालय.एन ई पी 2020 कार्यक्रम आयोजन.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

दिनांक 23 जानेवारी 2025 रोजी, रजनीताई देशमुख महाविद्यालय, भडगाव येथे आयोजित एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू होता, नवीन शिक्षण धोरण 2020 (एनईपी). उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात, भविष्यातील शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीवर होणाऱ्या बदलंबद्दल विस्तृत माहिती देण्यात आली.

 

या कार्यक्रमात अंगलो उर्दू हायस्कूल, भडगावच्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. नवीन शिक्षण धोरणाचा त्यांच्या भविष्यावर होणारा प्रभाव समजून घेण्यासाठी ते उत्सुक होते.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांना एनईपी 2020 च्या विविध पैलूंबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये नवीन अभ्यासक्रम, मूल्यमापन पद्धती, उच्च शिक्षणासाठीच्या संधी आणि करियर मार्गदर्शन यांचा समावेश होता. अंगलो उर्दू हायस्कूलचे दानिश सर आणि अजहर सर यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निवारण करून त्यांना योग्य रजनीताई देशमुख महाविद्यालय

महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.एन.एम.गायकवाड सर

श्री भैसे सर (भूगोल विभाग, एचओडी)

यांचे मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही नवीन शिक्षण धोरणाबद्दल अधिक जागरूक झाले.

 

विद्यार्थी आगामी बदलाला सामोरे जाण्यासाठी स्वतःला तयार करू शकतील.

 

विद्यार्थ्यांच्या मनातील शंकांचे निवारण झाले. एनईपी 2020 विद्यार्थ्यांसाठी अधिक संधी उघडेल, याची जाणीव झाली.

रजनीताई देशमुख महाविद्यालय आणि अंगलो उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम खूपच यशस्वी ठरला. या कार्यक्रमामुळे भडगावच्या विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होण्याची अपेक्षा आहे.

वाडे वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.!!!

0

वाडे वाचनालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाडे येथील नेताजी सुभाषग्राम वाचनालयात महान स्वातंञ्य सैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाचनालयाचे संचालक व पञकार अशोक परदेशी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण करण्यात आले.

यावेळी उपस्थित वाचनालयाचे पदाधिकारी , नागरीकांनीही पुजन केले. यावेळी कार्यक्रमाचे सुञसंचलन वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पतिंगराव पाटील यांनी केले. यावेळी वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पाटील, व्हाईस चेअरमन शामराव माळी, संचालक हिलाल चौधरी, नामदेव महाजन, दिलीप मोरे, अशोक परदेशी, सुशिलाबाई परदेशी, सचीव ओंकारदास बैरागी, योगेश परदेशी,ग्रंथपाल देविदास पाटील, एकनाथ मिस्तरी, सुधाकर पाटील, चांगदेव पाटील, विठ्ठल पाटील, रमेश पाटील, आबा पाटील यांचेसह नागरीक उपस्थित होते.

२६जानेवारीला राज्य सरकार मोठी घोषणा करणार,२१ नवीन जिल्हे होणार.?

0

२६जानेवारीला राज्य सरकार मोठी घोषणा करणार,२१ नवीन जिल्हे होणार.?

महसूलमंत्र्यांनी केलं स्पष्ट

नागपूर :-

गेल्या काही दिवसांपासून राज्यात नवीन २१ जिल्हे तयार होणार असल्याची बातमी सोशल मीडियावर जोराने व्हायरल होत आहे.

तसेच २६ जानेवारी रोजी नवीन जिल्ह्यांबाबत राज्य सरकारकडून घोषणा करण्यात येणार आहे. असं देखील या व्हायरल बातमीमध्ये सांगण्यात येत आहे. त्यामुळे खरंच राज्यात २१ नवीन जिल्हे तयार होणार का.?

याबाबत सर्वसामान्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे  यांनी माध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात कोणतेही नवीन जिल्हे होणार नाही. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र जिल्हाधिकाऱ्यांवरचा  वाढता ताण कमी करण्यासाठी काही जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी आणि त्याचे आस्थापना असा प्रस्ताव महसूल विभागाकडे आहे. असं देखील यावेळी बावनकुळे म्हणाले. ते आज नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यात नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव सध्या राज्य सरकारकडे आलेला नाही मात्र याबाबत पुढील जनगणनेनंतर निर्णय होऊ शकतो. पण अनेक ठिकाणी नवे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय केले जाऊ शकतात. त्यासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे.

अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाची आस्थापना १०० दिवसांच्या आत उभारण्याचे आमचे प्रयत्न आहेत. असं माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

तसेच नागपूर जिल्ह्यातील काटोल, पुणे येथील मावळ आणि बारामती, संभाजीनगर, या जिल्ह्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी आणि त्यांची आस्थापना नेमण्याचा प्रस्ताव १०० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचा विचार महसूल विभागाकडून करण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

थाई बॉक्सिंग: प्रेम संजय देवरे यांची सुवर्णमयी कामगिरी.!!!

0

थाई बॉक्सिंग: प्रेम संजय देवरे यांची सुवर्णमयी कामगिरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

2nd साऊथ एशियन थाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या प्रेम संजय देवरे यांनी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे. भडगाव तालुक्यातील प्रेम संजय देवरे यांनी याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे यशस्वी प्रतिनिधित्व केले असून त्यांच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदके आहेत. ही पदके त्यांच्या मेहनत, चिकाटी आणि कौशल्याची साक्ष देतात.

१७ ते १९ जानेवारी २०२५ दरम्यान भोपाल (मध्य प्रदेश) येथे झालेल्या या स्पर्धेत भारत, नेपाळ, भूतान आणि श्रीलंकेच्या खेळाडूंनी सहभाग घेतला होता. -५५ किग्रॅ वजनी गटात खेळत प्रेम संजय देवरे यांनी अप्रतिम कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

या यशामागे स्थानिक प्रशिक्षक अबरार खान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. याचबरोबर राष्ट्रीय पंच शाहरुख मणियार यांनीही स्पर्धेत पंच म्हणून भूमिका बजावत महत्त्वाचा वाटा उचलला.

प्रेम संजय देवरे यांच्या या विजयामुळे महाराष्ट्राचे क्रीडा क्षेत्रात नाव उंचावले आहे. त्यांच्या जिद्दीने आजच्या तरुणांना प्रेरणा मिळाली असून थाई बॉक्सिंगसारख्या खेळाला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. महाराष्ट्राचा अभिमान ठरलेल्या प्रेम संजय देवरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा

गावातील तरुणांच्या ञासाला कंटाळून एका जणाची आत्महत्या.!!!

0

गावातील तरुणांच्या ञासाला कंटाळून एका जणाची आत्महत्या.!!!

तरवाडे येथील घटना,निंभोरा ता भडगाव येथील तरूणांवर गुन्हा दाखल.•••

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव ता भडगाव गावातील तरुणांच्या सतत ञासाला कंटाळून निंभोरा ता भडगाव येथील एका तरूणाने आत्महत्या केल्याची घटना तरवाडे पेठ ता चाळीसगाव येथे दि २१ रोजी घडली आहे

याबाबत माहिती अशी की: निंभोरा ता भडगाव येथील मयत कल्पेश विकास पाटील वय (२१) या तरूणांला गावातील मागील भांडणातून सतत शारीरिक मानसिक छळ करीत असल्यामुळे मयत कल्पेश पाटील याने आपल्या मावशी च्या गावी तरवाडे पेठ ता चाळीसगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे या आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी विकास यादव पाटील यांच्या फिर्यादीवरून देवेंद्र गोरखनाथ पाटील, कुणाल अनिल पाटील, अनिल बापू पाटील,आशा अनिल पाटील, समाधान मुरलीधर पाटील, विशाल प्रमोद पाटील,विशाल पोपट पाटील सर्व राहणार निंभोरा ता भडगाव गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन संशयित आरोपींना अटक करून आज दि २२ रोजी भडगाव न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे असून एका महीलेसह तीन संशयित फरार आहेत या घटनेचा पुढील सहायक पोलिस निरीक्षक गणेश मस्के करीत आहे

आगीच्या अफवेची एक बोंब उठली अकरा प्रवाशांच्या जीवावर बेतली.!!! माहिती घ्या जळगाव रेल्वे अपघाताची मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना.•••

0

आगीच्या अफवेची एक बोंब उठली अकरा प्रवाशांच्या जीवावर बेतली.!!!

माहिती घ्या जळगाव रेल्वे अपघाताची मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना.•••

पाचोरा प्रतिनिधी :-

लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच हा अपघात झाला. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली.लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरताच हा अपघात झाला. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली असून अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली.

 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा रेल्वे स्थानकावर बुधवारी (22 जाने.2025) भीषण रेल्वे अपघात झाला. लखनौहून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर ही घटना घडली. या अफवेमुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली व अनेकांनी भीतीपोटी धावत्या रेल्वेतून उडी मारली. उडी मारून जवळच्या दुसऱ्या ट्रॅकवर आले, जिथे दिल्लीला जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या दुर्घटनेत आतापर्यंत ,अकरा जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

 

*अपघात कसा झाला*?

जळगाव ते पाचोरा स्थानकांदरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने जात होती, तर कर्नाटक एक्स्प्रेस दिल्लीच्या दिशेने जात होती. पुष्पक एक्स्प्रेसच्या खालून धूर निघताना दिसला, त्यानंतर ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. अनेक प्रवाशांनी घाबरून चालत्या रेल्वेतून उडी मारली. पुष्पक एक्सप्रेसच्या चालकाने अचानक ब्रेक मारल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. यामुळे घाबरून लोकांनी आग लागल्याची बोंब उडवली, मात्र उष्णतेमुळे धूर निघत होता, आग लागली नव्हती, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेस मुंबईकडे येत असताना पोचारा स्टेशनच्या जवळ एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक दाबला. यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. दरवाजात जे प्रवासी बसले होते, त्यांनी आग लागल्याची आरडाओरड करत पळापळ सुरू केली. त्यामुळे घाबरलेल्या प्रवाशांनी पुढचा मागचा काहीच विचार न करता रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. दुसऱ्या बाजूने कर्नाटक एक्स्प्रेस दिल्लीकडे जात होती. या ट्रेनचा हॉर्न ऐकू न आल्याने या एक्सप्रेसखाली अनेक प्रवासी चिरडले गेले. पुष्पक एक्स्प्रेस आता पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ थांबवण्यात आली.

मदत व बचाव कार्य सुरू –

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना पाचोरा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद मंत्री गिरीश महाजन आणि इतर अधिकारी ही घटनास्थळी रवाना झाले आहेत. डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात आहे. आठ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या असून रेल्वेच्या अतिरिक्त रेस्क्यू व्हॅन आणि अॅम्ब्युलन्सही पाठविण्यात येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकरा जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून पीडितांना सर्वतोपरी मदत केली जात आहे.

 

महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली असता यावेळी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते,अप्पर पोलीस अधीक्षक कविताताई नेरकर , प्रांताधिकारी श्री भुषण अहिरे,डी वाय एस पी राजेश चंदिले ,डी वाय एस पी धनंजय येरुळे, तहसीलदार श्री विजय बनसोडे,पोलीस निरीक्षक अशोक पवार तसेच इतर अधिकारी यांनी घटनास्थळी माहिती घेऊन वरिष्ठांना कळवली

 

जळगावचे पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह जळगावला पाठविण्यात आले आहेत.जखमींना तातडीने मदत करा – फडणवीस

या अपघाताबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जळगाव रेल्वे अपघातावर पोस्ट केली आहे त्यांनी म्हटले की, आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून असून जखमींना तातडीने मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

गोंडगाव विदयालयात आनंद मेळावा आनंदात साजरा.

0

गोंडगाव विदयालयात आनंद मेळावा आनंदात साजरा.

विदयार्थ्यांनी खादय पदार्थाचे लावले ३५ स्टाॅल.विदयार्थ्यांनी अभ्यासासोबतच गिरवले व्यवहाराचे धडे.

भडगाव प्रतिनिधी :—

चाळीसगाव येथील रा. स. शि. प्र. मंडळ संचलीत

गोंडगाव येथील माध्यमिक विदयालयात दि. २१ रोजी सकाळी ९ वाजता आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा आनंद मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंद मेळाव्यात विदयार्थी, विदयार्थीनींनी खादय पदार्थ विक्रीचे एकुण ३५ स्टाॅल लावलेले होते. खादय पदार्थ खरेदी, विक्रीतुन विदयार्थ्यांना अभ्यासासोबतच आर्थिक व्यवहार, देवाण, घेवाणीचे ज्ञान मिळाले.विविध गोड,तिखट, आंबट, स्वादिष्ट खादय पदार्थांचा लाभ विदयार्थ्यांसह नागरीक, पालक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी मनसोक्त घेतला. या मेळावा कार्यक्रमाचे उदघाटन विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ यांच्या हस्ते फित कापुन व नारळ फोडुन करण्यात आले. सुरुवातीस मान्यवरांचे हस्ते सरस्वती मातेचे पुजन करण्यात आले.

तसेच विदयालयामार्फत ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीक, पालक वर्गाचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ यांचा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीकांनी शाल, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विदयार्थी, विदयार्थीनींनी खादय पदार्थांचे एकुण ३५ स्टाॅल लावलेले होते. यात पाणीपुरी, पाववडे, भेळ, तिळीचे लाडु, शेंगदाणे लाडु, पाॅपकाॅर्न, मोमोझ, वडापाव, पाणीपुरी, सोयाबीन चिल्ली, ईडली, कोशिंबीर वडया, खमंग, पावभाजी, वेफर्स, दाबेली, उकडलेल्या भुईमुग शेंगा, गोड बोर, लिंबु पोहे, मटकी भेळ, मिसळ पाव, व्हेज पुलावा, रसा पोहे, चवळी फल्ली यासह अनेक गोड, तिखट, चविष्ट खादय पदार्थांचा शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, नागरीक, पालक व विदयार्थी,

विदयार्थीनींनी आनंदाने लाभ घेतला. या आनंद मेळाव्याच्या खादय पदार्थ विक्रीतुन विदयार्थ्यांना पैशांची देवाण घेवाणीसह व्यवहाराचे ज्ञान मिळाले. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बंडु निकम, सदस्य मनोज पाटील, जि. प. प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन अध्यक्ष राहुल सोनार, माजी अध्यक्ष ललीत मांडोळे, विदयालयाचे शिक्षक, पालक सभेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र शार्दुल, पञकार रतिलाल पाटील, दिपक फुलपगारे, जेष्ट नागरीक रमेश खैरनार, मुरलीधर पाटील,

विनायक पाटील, स्वप्निल सोनवणे, भावडु खैरनार, राजेंद्र पाटील, किशोर ठाकुर यांचेसह पालक वर्ग, माजी विदयार्थी, नागरीक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक कल्याणराव वाघ, शिक्षक पि. व्ही. जाधव, सी. एस. सोन्नीस, एस. डी. चौधरी, व्हि. ए. पाटील, एस. वाय. पाटील, पी. व्ही. सोळंके, बी. डी. बोरसे, एस. एस. आम्ले, आर. एस. सैंदाणे, एस. आर. महाजन, एन. ए. मोरे, आर. बी. महाले, पी. जे. देशमुख, एस. जी. भोपे,ए. एम. परदेशी, एस. एल. मोरे, व्हि. एम. जाधव आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्विततेसाठी संपुर्ण स्टाॅफचे परीश्रम लाभले.आनंद मेळावा मोठया आनंदात पार पडला.

 

पाचोरा तालुका कलाध्यापक संघ कार्यकारणी जाहीर

0

पाचोरा तालुका कलाध्यापक संघ कार्यकारणी जाहीर

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा तालुका कलाध्यापक संघ सहविचार सभा दि 19 /1/2025 रोजी संस्कार इंटरनॅशनल स्कूल येथे आयोजित करण्यात आली.

सभेची सुरुवात मा.अध्यक्ष – निलेशकुमार लक्ष्मणराव कुमावत (पी.डी. बडोला मा. वी. वरखेडी )यांनी केलेल्या कार्याचा उजाळा मांडला. कला संघटना हिच कलाध्यापकांच बळ वाढवत असते असे मत कुमावत सरांनी मांडले.

कलाध्यापक संघांचे मा.सचिव सुबोध मुरलीधर कांतायन(श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा)यांनी सर्व कलाध्यापकांमुळेच पाचोरा तालुका कलाध्यापक संघ मजबूत झाला व विविध कलात्मक उपक्रमांमध्ये सर्वांची साथ मिळाली. असे मत कांतायन सरांनी मांडून, विविध विषयांवर सर्वांनी चर्चा केली.

दि.8 व 9 फेब्रुवारी 2025 रोजी पंढरपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कलाशिक्षकांच्या अधिवेशनास  जाण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी जाहिरात व लेख देण्यासंबंधी माहिती देण्यात आली. अधिवेशनास उपस्थित राहण्यासंबंधी कला शिक्षकांनी सहमती दर्शवली.

 

1जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर2026 पर्यंत पाचोरा कलाध्यापक संघाची नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळी अध्यक्ष म्हणून मनोज रंगलाल जाधव यांची व , सचिव म्हणून विजय बळवंतराव पाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली सोबतच कार्याध्यक्ष- प्रशांत मालकर, सहसचिव -चेतन पाटील, कोषाध्यक्ष -ललित बडगे, सहकार्यध्यक्ष -भगवान परदेशी, प्रसिद्धीप्रमुख- प्रमोद पाटील, स्पर्धाप्रमुख- संदीप पाटील ,उपाध्यक्ष- स्वप्नील पाटील, गणेश आगळे, प्रशांत सोनवणे, संदीप वानखेडे, प्रदीप सोनार,

सल्लागार -अशोक सोनार, सुनील भिवसने, परशुराम पवार, सुनील लोहार याची सर्वानुमते निवड करण्यात आली.

सर्व नूतन कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य केले . आभार प्रदर्शन प्रदीप सोनार यांनी मानले.

error: Content is protected !!