जळगाव

वाडे विकासोच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि अशोक परदेशी व व्हाईस चेअरमन पदि सुपडु मोरे यांची बिनविरोध निवड.

वाडे विकासोच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि अशोक परदेशी व व्हाईस चेअरमन पदि सुपडु मोरे यांची बिनविरोध निवड.

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील वाडे येथील श्री. हनुमान विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदि अशोक भुतेसिंग परदेशी तर व्हाईस चेअरमन पदि सुपडु गंगाराम मोरे या दोघांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल संचालक मंडळ व उपस्थित नागरीकांनी नवनिर्वाचीत चेअरमन अशोक परदेशी,

व्हाईस चेअरमन सुपडु मोरे या दोघांचा सत्कार करण्यात आला. ठरल्याप्रमाणे उदयसिंग बाबुसिंग परदेशी यांनी चेअरमन पदाचा तर केशरबाई लक्ष्मण माळी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिला. या रिक्त जागेसाठी हा निवडीचा कार्यक्रम दि. १२ रोजी गुरुवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आला. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे अधिकारी सुनिल पवार यांनी काम पाहीले. त्यांना संस्थेचे सचीव अर्जुन पाटील, तसेच सहाय्यक निबंधक कार्यालयाचे कर्मचारी प्रेमसिंग राजपुत यांनी सहकार्य केले. याप्रसंगी देविदास सहादु माळी, उदयसिंग बाबुसिंग परदेशी,विजय रामलाल परदेशी, साहेबराव कौतीक माळी, डाॅ. दिवाकर वेडु पाटील, चंद्रशेखर विष्णु चौधरी,

भाऊसाहेब नामदेव पाटील, कैलास अभिमन माळी, सुपडु गंगाराम मोरे, केशरबाई लक्ष्मण माळी, संगीताबाई शांताराम पाटील, सुंदरबाई रामदास माळी आदि संचालक तसेच माजी चेअरमन नारायण परदेशी, माजी सरपंच आधार माळी, माजी उपसरपंच शामराव माळी, माजी उपसरपंच राजीव परदेशी, विजयसिंग गोमलाडु, बाजीराव माळी, दिनकर पेंटर, शिवसिंग गोमलाडु, जालींदर चित्ते, वामन माळी, सुनिल पाटील, नथ्थुसिंग परदेशी,मुकेश परदेशी, घनशाम परदेशी टेकवाडे बुद्रुक, हेमराज माळी, नारायण महाजन, टेकवाडे खुर्द माजी सरपंच वाल्मीक पाटील , शांताराम पाटील यांचेसह नागरीक उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर माळी, प्रविण अहिरराव, दुलीचंद परदेशी आदि कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!