
राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून घुसर्डी येथील नागरिकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
भडगाव प्रतिनिधी :- (जावेद शेख)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या सक्षम, लोकाभिमुख व संविधान रक्षणाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून घुसर्डी (ता. भडगाव जि. जळगाव) येथील अनेक नागरिकांनी भारतीय काँग्रेस पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश सोहळा जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप राव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच विधानसभा अध्यक्ष मा. मनोहर शिवाजी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप राव पवार यांनी सांगितले की, “देशातील लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी काँग्रेस पक्ष सातत्याने लढा देत आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली युवक, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांना न्याय देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे.”
युवक विधानसभा अध्यक्ष मनोहर शिवाजी महाले यांनी म्हटले की, “घुसर्डी येथील नागरिकांनी काँग्रेसच्या विचारधारेवर व राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करून पक्षात प्रवेश केला, ही अभिमानाची बाब आहे. आगामी काळात गावाच्या व जिल्हा परिषद गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काँग्रेस पक्ष ठामपणे काम करेल.”
प्रवेश घेतलेले
गोकुळ काशिनाथ शिंदे, बाळासाहेब माधवराव शिंदे ,महेंद्र रामचंद्र शिंदे, शिवम गोकुळ शिंदे, अमोल मनोज पाटील, गोपाल शिंदे ,शुभम शिवाजी शिंदे, भूषण शिंदे, पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या विचारधारेनुसार प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी स्थानिक पदाधिकारी युवक शहराध्यक्ष आबा देशमुख, युवक विधानसभा उपाध्यक्ष धनंजय शिंदे ,युवक तालुका सचिव शुभम शिंदे, युवक तालुका उपध्यक्ष शुभम शिवाजी शिंदे, युवक तालुका सरचिटणीस अर्जुन शिंदे, अनिकेत शिंदे ,कार्यकर्ते उपस्थित होते.



