
वाडे येथे सार्वजनिक शोकसभेचे आयोजन .!!!
भडगाव प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार व त्यांच्या बरोबर असणारे सहप्रवासी यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्याबद्दल वाडे ता.भडगाव येथे दि. ८ रोजी रविवारी सायंकाळी ७ वाजता ग्रामपंचायत कार्यालय समोर सर्वपक्षीय सार्वजनिक शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. शोकसभेला ग्रामस्थ व पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्व.अजित पवार यांच्या प्रतिमेचे पुजन व पूष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.कवि नामदेव महाजन यांनी स्व.अजित पवार यांच्या विषयी आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शेतकरी सेनेचे परशुराम महाजन यांनी केले.ग.स.चे माजी संचालक व राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील निंबा पाटील यांनी स्व.अजित पवारां विषयी शोक संवेदना व्यक्त करताना ग्रामीण भागाशी अजीत पवारांची असणारी नाळ व महाराष्ट्राच्या विकासासाठी असणारे योगदानाबद्दल माहित देऊन बहूजन समाजाचा तसेच दूरदृष्टी असलेला लोकनेता गमावल्याची खंत व्यक्त केली.कार्यक्रमाच्या शेवटी विमान अपघातात स्व.अजित पवार यांच्या बरोबर मयत पावलेले पायलट, विमान कर्मचारी या सर्वांना उपस्थित ग्रामस्थांनी उभे राहून सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी नाना महाजन, उपसरपंच गुलाब पाटील,माजी उपसरपंच प्रविण पाटील,भा.ज.पा.जिल्हा उपाध्यक्ष परेश पाटील, एकनाथ फौजी, सुरेश पाटील, डॉ.काशिनाथ महाजन,जगतसिंग राजपूत,पत्रकार अशोक परदेशी, प्रमोद वैष्णव, लक्ष्मण बोरसे, डॉ.गोसावी तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



