जळगावसामाजिक

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची एरंडोल तालुका , व कासोदा शहर कार्यकारणी जाहीर.!!!

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची एरंडोल तालुका , व कासोदा शहर कार्यकारणी जाहीर.!!!

कासोदा प्रतिनिधी :-

येथे दि.२५ एप्रिल रविवार रोजी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची बैठक घेण्यात आली. त्यात एरंडोल तालुका व कासोदा शहर कार्यकारणीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

त्यात एरंडोल तालुका अध्यक्ष पदी नुरुद्दीन मुल्लाजी तर तालुका उपाध्यक्ष घनश्याम पांडे , तालुका संघटक योगेश चौधरी , तालुका कायदेशीर सल्लागार वासुदेव वारे , तालुका संपर्क प्रमुख शैलेश मंत्री , तालुका सदस्य राहूल शिंपी तर कासोदा शहर अध्यक्ष पदी शैलेश पांडे , शहर उपाध्यक्ष गणेश मोरे , शहर संघटक इम्रान शेख यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हेल्मेट व नियुक्ती पत्र देण्यात आले.

त्याप्रसंगी प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर रायसाकडा , उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भुवनेश दुसाने , उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अबरार मिर्झा , खान्देश संपर्क प्रमुख सागर शेलार ,जैनूल भाई, आरीफ पेंटर ,अयाज आप्पा शेख उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!