आदिवासी तडवी भिल्ल समाजाचा सामूहिक विवाह सोहळा निमित्त ;मणियार बिरादरीने १० किचन सेट दान केले
जळगांव प्रतिनिधी :-
जळगाव जिल्हा मुस्लिम मणियार बिरादरी जळगाव यांच्या वतीने रविवारी पहूर येथील महात्मा फुले माळी समाज मंगल कार्यालयात झालेल्या आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या सामूहिक विवाहात नवविवाहित दाम्पत्यांना १० स्वयंपाकघरातील भांड्यांचा संच देण्यात आला.
या उपक्रमाचे उद्दिष्ट
नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला आवश्यक घरगुती वस्तू पुरवणे हा यामागचा उद्देश आहे.
सामूहिक विवाहाचे महत्त्व: फारुख शेख
फारुख शेख यांनी आपल्या मोजक्या शब्दांत मार्गदर्शन करताना सांगितले की, सामूहिक विवाह हा एक असा कार्यक्रम आहे ज्यामध्ये अनेक जोडप्यांचे एकत्र लग्न केले जाते. हा कार्यक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर नाही तर सामाजिक एकता आणि सामुदायिक भावनेला देखील प्रोत्साहन देतो.
स्वयंपाकघरातील भांडी संच पुरवण्याचा उद्देश
आमचे उद्दिष्ट नवविवाहित जोडप्यांना त्यांच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीला आवश्यक घरगुती वस्तू पुरवणे, त्यांना त्यांचे घर उभारण्यास मदत करणे हे आहे. त्यांना स्वयंपाकघरातील भांड्यांचा संच भेट दिल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरेल आणि त्यांचे घर सुरळीत चालण्यास मदत होईल.
आदिवासी तडवी भिल्ल समुदायाशी सहकार्य
यावेळी मनियार बिरादरीचे अध्यक्ष फारुख शेख यांनी आपल्या भाषणात नवविवाहित जोडप्यांना आणि उपस्थित समुदायाला संबोधित करताना पुढे सांगितले की, आदिवासी तडवी भिल्ल समाजाच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी समुदाय कटिबद्ध आहे. आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम केवळ नवविवाहित जोडप्यांसाठीच उपयुक्त ठरणार नाही तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यास देखील मदत करेल. तसेच, हे जोडपे आपापल्या धर्माचे पालन करतील आणि त्यांचा धर्म बदलणार नाहीत.
यांची होती उपस्थिती
भाजपचे सरचिटणीस अरविंद देशमुख, पहूरचे माजी सरपंच प्रवीण लोढा, पहूरचे सरपंच अब्बू तडवी, मौलाना मुजाहिद तडवी, अँड एसआर पाटील, राजधर पांढरे, इका पहेलवान, फिरोज तडवी, इरफान शेख, हारून पठाण, बीड येथील मौलाना व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामूहिक विवाह पार पडला.