मळगाव येथे महापरीनिर्वाण दिन साजरा.!!!
भडगाव प्रतिनिधी :—
६ डिसेंबर २०२५ रोजी मळगाव समाज मंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुजन उपस्थित मान्यवरांसह समाजबांधव व नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भीमस्तुती पंचशील व शरणत्य हे कुमारी पंचशीला बाबासाहेब सोनवणे,अश्विनी सुखदेव मोरे व अपेक्षा अनिल सैंदाणे यांनी घेतले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्जेराव भास्कर सोनवणे हे होते. कार्यक्रमासाठी मुख्य प्रवक्ते प्राध्यापक राजेंद्र कचरू परदेशी यांनी सर्व समाज बांधवांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती असलेल्या घटनांचे कथन करून सर्वांना संबोधित केले.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश भाऊराव मोरे यांनी केले. व सर्व समाज बांधवांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन त्रिवार वंदन केले. या कार्यक्रमास समाजबांधव, ग्रामपंचायतीचे आजी माजी पदाधिकारी, विकासोचे आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ मोठया संख्येने हजर होते.
