महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदिवासी आश्रमशाळेत अन्नदान.!!!
ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृती दिनानिमित्त विठ्ठल उमप फाउंडेशन तर्फे आदिवासी मुला–मुलींच्या आश्रमशाळेत अन्नदान कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि वंचित विद्यार्थ्यांच्या पोषणासाठी आयोजित हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रम बाबरेवाडीतील आदिवासी कातकरी मुलां–मुलींच्या आश्रमशाळेत घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून आले. ग्रामीण व आदिवासी समाजातील मुलांच्या शिक्षणप्रवासाला हातभार लावणे आणि पोषणाची काळजी घेणे या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक अध्यक्ष – शाहीर नंदेश विठ्ठल उमप होते, तर सदस्य म्हणून सरिता नंदेश उमप, सचिन चिरगुटकर आणि सुमेध यांनी सहभाग नोंदवला. फाउंडेशनच्या सर्व सदस्यांच्या प्रयत्नांमुळे अन्नदान उपक्रम यशस्वी आणि सुरळीत पार पडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या तत्त्वज्ञानाची आणि लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या सामाजिक कार्याची आठवण करून देणाऱ्या या उपक्रमातून प्रेम, सहकार्य आणि सेवाभावाचा संदेश समाजापर्यंत पोहोचवला गेला. विठ्ठल उमप फाउंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याची ही नोंद प्रेरणादायी ठरली.
