कपाशी व्यापाऱ्यांन कडुन शेतकऱ्यांची फसवणुक; भडगांव पोलिसात दोन जणा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल.!!!
भडगांव प्रतिनिधी :-
तालुक्यातील लोण पिराचे सह अनेक गावातील शेतकऱ्यांची निंभोरा व कोठली येथील कपाशी व्यापाऱ्यांनी मापात पाप करीत काटा मारून कमी कपाशी मोजुन लाखो रुपयांची फसवणुन केल्या प्रकरणी लोण पिराचे येथील शेतकऱ्यांच्या फिर्यादीवरून भडगांव पोलिसात दोन जणा विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील लोणपिराचे येथे दि.६ डिसेंबर ते ८ डिसेंबर च्या दरम्यान कपाशी व्यापारी राजेंद्र यशवंत पाटील रा. निंभोरा व नाना राजधर पाटील रा.कोठली या दोघा व्यापाऱ्यांनी स्वताःच्या फायद्या साठी फिर्यादी- विजय नारायण वाघ रा.लोणपिराचे ता. भडगांव यांच्या सह फिर्यादीत नमूद असणाऱ्या अशा अनेक शेतकऱ्यांची २९.८९ किंटल कपाशी कमी मोजुन शेतकऱ्यांची २०३३०६ रुपयांची विश्वास घात करीत फसवणुक केली आहे. दोन्ही व्यापाऱ्यांचा खोटे पणा उघडकीस आल्याने त्यांचे सोबत आणलेली मालवाहतुक पिक अप गाडी क्रमांक- एम एच- १९ बी.एम.२८३६ व त्यात कपाशी व्यापारी यांनी कपाशी मोजण्या कामी आणलेला वजन काटा सोडुन पळुन गेल्याने पिक अप गाडी क्रमांक- एम एच-१९ बी.एम.२८३६ व त्यात कपाशी मोजण्या कामी आणलेला वजन काटा भडगांव पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत फिर्यादी-विजय नारायण वाघ रा.लोणपिराचे ता. भडगांव यांच्या फिर्यादी वरून भडगांव पोलिसात संशयित आरोपी-कपाशी व्यापारी-राजेंद्र यशवंत पाटील रा.निंभोरा व नाना राजधर पाटील रा.कोठली याच्या विरोधात गुन्हा रंजी नं ४४३/२०२५ भा.न्या.सं. कलम३१६(२)३१८(४),३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.
