जळगावमहाराष्ट्रसामाजिक

भडगावचे रविंद्र पाटील यांना पोलिस उपनिरिक्षकपदी पदोन्नती. पञकार अशोक परदेशी यांनी केला सत्कार.

भडगावचे रविंद्र पाटील यांना पोलिस उपनिरिक्षकपदी पदोन्नती. पञकार अशोक परदेशी यांनी केला सत्कार.

भडगाव प्रतिनिधी:-

येथील रहीवाशी व सध्या कासोदा पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले रविंद्र गोरख पाटील यांना नुकतीच पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती मिळाली आहे . त्यांच्या नियुक्ति मुळे त्यांच्या परिवारात, नातेवाईक , तसेच मित्रपरिवार , व हितचिंतकांमध्ये आनंद साजरा होत आहे .

रविंद्र गोरख पाटिल यांनी सन १९९१ साली पोलिस दलात भरती होऊन आतापर्यंत यावल , चाळीसगाव , भडगाव , पाचोरा , व सध्या कासोदा येथील पोलीस विभागात सेवा बजावली आहे . गुन्ह्याच्या तपास कामी व माहिती मिळवण्यात त्यांचा हातखंडा आहे . तसेच जनतेत व पत्रकारांमध्ये देखील त्यांचा मोठा संपर्क असतो .

जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ . महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती यादीत रविंद्र गोरख पाटील यांच्या नावाचा देखील समावेश असुन त्यांची पोलीस उपनिरिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे . रविंद्र पाटील यांनी भडगाव पोलिस स्टेशनला देखील सेवा बजावली असुन त्यांना राजकीय , सामाजीक , व पोलीस दलातील सेवा इत्यादी क्षेत्रांचा अनुभव आहे . त्यांच्या पत्नी रंजना रविंद्र पाटील हया देखील भडगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका होत्या. रविंद्र पाटील यांना पोलिस उपनिरिक्षक पदी नियुक्ती बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .

त्यांच्या या पदोन्नतीच्या नियुक्ती बद्दल त्यांचे मिञ भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी, पञकार मोहन सोनार, पञकार अशोक परदेशी यांचेसह मिञ परीवारामार्फत पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!