वाडे येथील शिवराज पाटील याचे सुयश.
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यातील वाडे येथील रहिवाशी उदयराज दिनकरराव पाटील यांचा मुलगा शिवराज उदयराज पाटील हा पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत येणाऱ्या नाशिक येथील के.के.वाघ महाविद्यालय नाशिक या कॉलेजात बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिट्रेशन या प्रथम वर्षात ८० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाला आहे. शिवराज पाटील हा विदयार्थी वाडे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाचे चेअरमन दिनकरराव पतींगराव पाटील यांचा नातु आहे. तर मुंबई येथे पोलीस निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले नंदराज पाटील यांचा तो पुतण्या आहे. या यशा बद्दल शिवराज पाटील याचे वाडे येथील नेताजी सुभाष ग्राम वाचनालयाच्या संचालक मंडळ व कर्मचारी तसेच ग्रामस्थांकडुन हार्दिक अभिनंदन होत आहे.