कासोद्यात बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.!!!

0 1,235

कासोद्यात बॅनर लावण्याच्या वादातून दोन गटांत हाणामारी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल.!!!

 

एरंडोल प्रतिनिधी :-

कासोदा शहरात कव्वाली कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन हाणामारी झाल्याची घटना दि. १४ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी जैनुद्दीन नजमुद्दीन शेख यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी आरोपींचा बॅनर काढल्याने रागाच्या भरात आरोपी जावीद शेख सुपडू, मोहसिन शेख सुपडू, नाजिम शेख सुपडू (सर्व रा. मुल्लाजी नगर) यांनी त्यांच्यावर एकत्रितपणे हल्ला केला.

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी त्यांच्या पायाच्या मांडीवर, पाठीवर, कंबरेवर, डोक्यावर व छातीवर जबर मारहाण केली. यावेळी आरोपींनी शिवीगाळ करत दमदाटी केली आणि शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण करणारी असल्यामुळे पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ११८(२)(१), ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास स.पो.नि. निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. श्रीकांत गायकवाड करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!