माऊली फाउंडेशन भडगावच्या वतीने नगर देवळा स्टेशन शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
माऊली फाउंडेशन, भडगाव यांच्या वतीने नगरदेवळा स्टेशन वस्तीतील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. माऊली फाउंडेशन भडगाव शहर व भडगाव तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवित असते.आरोग्य,शिक्षण,पर्यावरण आदी विषयांवर माऊली फाउंडेशनच्या वतीने विविध उपक्रम राबवले जातात.सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले.माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या पत्नी दिपा सूर्यवंशी ह्या अमेरिकेहून भडगाव येथे आलेल्या आहेत.त्यांच्याच संकल्पनेतून स्वेटर वाटपाचा कार्यक्रम पार पडला.छोटेखानी पार पडलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दिपा सूर्यवंशी यांनी भूषविले.कार्यक्रम प्रसंगी विश्वास पाटील,
संचालक,कृ.उ.बाजार समिती पाचोरा,संजय भोई,ग्रा.प.सदस्य,संतोष सपकाळे,पत्रकार गणेश रावळ,संजय सोनार, दिपमाला जगताप,रवींद्र कुलकर्णी,संजय सपकाळे,प्रदीप मासरे,शाहीद शेख ,समाधान भाऊ,रोशन आरा,मीना भोई,भाग्यश्री भोई,अरमान बी,रणदिवे काका,राम भाई,
अंगणवाडी सेविका,पालक व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.माऊली फाऊंडेशनच्या कार्याची-उपक्रमांची माहिती संचालक संगीता जाधव,करीमा खान,संजय सोनार मामा कळवाडीकर,कुलकर्णी मॅडम,गणेश पाटील,समाधान पाटील यांनी मनोगतातून व्यक्त केले.कार्यक्रमाची प्रस्तावना योगेश शिंपी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील सर,तर आभार हिलाल पाटील सर यांनी मानले.
