लासगाव ग्रामस्थांकडून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लासगाव ग्रामस्थांच्या वतीने उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले होते.
ग्रामपंचायत लासगाव, स्थानिक युवक मंडळ तसेच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिरात मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण घालून दिले.
या शिबिरात जि.प. सदस्य पदमसिंह पाटील यांनी स्वतः रक्तदान करून इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या लोकाभिमुख कार्यशैलीचे आणि विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात सुरू असलेल्या विविध विकास उपक्रमांमुळे होत असलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गावातील युवकांनी केले, तर सुत्रसंचालन जि.प. सदस्य पदमसिंह पाटील यांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केक कापून आमदारांच्या वाढदिवसाचा आनंद उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अशोक पाटील, युवराज पाटील, समाधान पाटील, वाहिद देशमुख, इमरान सर, गोपाल पाटील, राजेंद्र तावडे, किशोर पाटील, गणेश पाटील, विजय पाटील, राजू महाजन, मुकीम शेख, विक्रम पाटील, पांडुरंग पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
