भडगांव शहरात दिवसाढवळ्या चोरी — गिरणाई कृषी केंद्रासमोर मोटारसायकलच्या डिक्कीतून पावणे तीन लाखांची रोकड लंपास.!!!
भडगांव शहरात दिवसाढवळ्या चोरी — गिरणाई कृषी केंद्रासमोर मोटारसायकलच्या डिक्कीतून पावणे तीन लाखांची रोकड लंपास.!!!
भडगांव प्रतिनिधी :-
भडगांव शहरातील पाचोरा चौफुली परिसरात दिवसाढवळ्या चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. गिरणाई कृषी केंद्रासमोर उभी असलेल्या मोटारसायकलच्या डिक्कीत ठेवलेली तब्बल पावणे तीन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना आज (गुरुवार, दि. ३० ऑक्टोबर) दुपारी घडली. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, भडगांव पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,भडगांव तालुक्यातील
पिंपरखेड येथील शेतकरी राकेश प्रकाश पाटील हे भडगांव येथील स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखेतून पैसे काडुन आपल्या कामा निमित्त गिरणाई कृषी केंद्रा समोर थोडा वेळ थांबले असता त्यांच्या मोटार सायकलच्या डिक्कीत त्यांनी सुमारे ₹२ लाख ७४ हजारांची रोकड ठेवली होती. काही मिनिटांनंतर त्यांनी परत येऊन पाहिले असता, डिक्की उघडी असून त्यातील रोकड गायब झाल्याचे लक्षात आले.
याबाबत त्यांनी तत्काळ भडगांव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने ही रोकड चोरून नेली असून, पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांची तत्काळ कारवाई :
घटनेची माहिती मिळताच भडगांव पोलिस निरीक्षक व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फूटेज तपासण्यास सुरुवात केली असून, संशयित व्यक्तींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी काही संशयितांची चौकशीही सुरू केल्याची माहिती मिळाली आहे.
भडगांव शहरात वाढत्या चोरीच्या घटना शहरातील सिसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने चोरीचे प्रमाण वाढले
अलीकडच्या काही दिवसांत भडगांव शहरात चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना घडल्याने शहरातील सिसीटिव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नागरिकांनी मोठी रोकड किंवा मौल्यवान वस्तू वाहनात ठेवू नयेत, तसेच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
याबाबत पुढील तपास भडगांव पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील दुकानाच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पोलिसांना लवकरच आरोपीला गजाआड करण्याचा विश्वास आहे.