ब्रेकिंग न्यूज
पाचोरा नगरपालिका निवडणूक 2025 प्रभागनिहाय आरक्षण जाहीर.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा नगरपालिकेच्या आगामी 2025 च्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले असून यंदा नगरपालिकेत एक प्रभाग वाढल्याने एकूण 14 प्रभागांमधून 28 नगरसेवक निवडून येणार आहेत. या निवडणुकीत विविध प्रवर्गांनुसार आरक्षण निश्चित करण्यात आले असून महिला उमेदवारांसाठी एकूण 14 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
आरक्षणाचे प्रमाण
एकूण नगरसेवक जागा : 28
अनुसूचित जाती (SC) : 3 जागा, त्यापैकी 2 महिला राखीव
अनुसूचित जमाती (ST) : 1 जागा (सामान्य – महिला किंवा पुरुष कोणालाही)
इतर मागासवर्गीय (OBC) : 8 जागा, त्यापैकी 4 महिला राखीव
सामान्य प्रवर्ग (General) : 16 जागा, त्यापैकी 8 महिला राखीव
अशा प्रकारे एकूण 28 पैकी 14 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
या आरक्षणासाठी 2011 च्या जनगणनेनुसार 59,609 लोकसंख्या गृहीत धरली गेली आहे.
त्यात अनुसूचित जातींची लोकसंख्या 5,919 व अनुसूचित जमातींची लोकसंख्या 2,022 इतकी आहे.
प्रभागनिहाय आरक्षण तपशील
प्रभाग क्रमांक पहिली जागा (अ) दुसरी जागा (ब)
1 अनुसूचित जाती (SC) महिला सामान्य
2 अनुसूचित जाती (SC) सामान्य सामान्य महिला
3 ओबीसी (OBC) महिला सामान्य
4 ओबीसी (OBC) सामान्य महिला
5 ओबीसी (OBC) महिला सामान्य
6 अनुसूचित जमाती (ST) सामान्य सामान्य महिला
7 अनुसूचित जाती (SC) महिला सामान्य
8 ओबीसी (OBC) महिला सामान्य
9 ओबीसी (OBC) सामान्य महिला
10 ओबीसी (OBC) सामान्य महिला
11 सामान्य महिला सामान्य
12 सामान्य महिला सामान्य
13 ओबीसी (OBC) महिला सामान्य
14 ओबीसी (OBC) सामान्य महिला
आरक्षण चिठ्ठ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढल्या
पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करण्यासाठी लॉटरी प्रक्रिया पार पडली. या वेळी गो. से. हायस्कूलचे विद्यार्थी चेतन किशोर पाटील (इ. ७ वी) आणि लावण्या बबनराव पाटील (इ. ६ वी) यांच्या हस्ते आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
या कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी मंगेश देवरे,
उपमुख्याधिकारी डी. एस. मराठे,
तसेच दुर्गेश सोनवणे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांमध्ये उत्सुकता
या आरक्षणामुळे शहरात निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. विविध पक्ष आणि इच्छुक उमेदवार आता आपल्या प्रभागातील आरक्षणानुसार उमेदवारीसाठी रणनीती आखू लागले आहेत. महिला आरक्षणाचे प्रमाण लक्षणीय असल्याने अनेक महिला कार्यकर्त्यांना संधी मिळण्याची अपेक्षा आहे.