मदनी नगर व मिल्लतनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव – नागरिक भयभीत.!!!

0 97

मदनी नगर व मिल्लतनगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव – नागरिक भयभीत.!!!

पाचोरा प्रतिनिधी :-

पाचोरा शहरातील मदनी नगर व मिल्लतनगर परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढली असून त्यामुळे स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सदर भागात पाच ते सहा शाळा असल्यामुळे दररोज शेकडो विद्यार्थी या मार्गावरून प्रवास करतात. मात्र मोठ्या थव्याने फिरणारे कुत्रे विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून येतात, त्यांच्यावर झडप घालतात. यामुळे अपघात होण्याची आणि जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक व महिलांसाठीही रस्त्यावरून सुरक्षितपणे चालणे कठीण झाले आहे.

या वाढत्या कुत्र्यांच्या उपद्रवामुळे मदनी नगर व मिल्लतनगर भागातील नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. अन्यथा एखादी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

निवेदन देताना सईद शब्बीर शेख, जाकीर मोहम्मद शेख मोईनोद्दीन, मुजीब खान अस्लम खान, अनिस अब्दुल खलिक आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!