जळगावसामाजिक

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाजातर्फे अभिवादन.!!!

संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाजातर्फे अभिवादन.!!!

भडगांव प्रतिनिधी :-

दि. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी भडगांव येथील देशपांडे वाड्यातील विठ्ठल मंदिरात सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांची पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाश जनार्दन सोनार होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भडगांव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक अतुलसिंह परदेशी उपस्थित होते.

 

प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर अध्यक्ष प्रकाश सोनार यांच्या हस्ते संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजाचे सचिव बाळासाहेब जडे यांनी केले. यावेळी माजी अध्यक्ष सुरेंद्र मोरे यांनी मागील वर्षातील समाजकार्याचा आढावा घेत पुढील कार्यकारिणीच्या नियोजनाबाबत माहिती दिली.

 

पूजनानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी समाजातील महिला वर्गाचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष प्रकाश सोनार, उपाध्यक्ष हेमंत विसपुते, माजी अध्यक्ष सुरेंद्र मोरे, खजिनदार महेश पोद्दार व सल्लागार मोहन सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.

 

आरोग्य सेवक संजय कळवाडीकर यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी भडगांव सोनार समाजातील अशोक भडगांवकर, मनोज दुसाने, दीपक बागुल, राहुल सोनार, दिलीप विसपुते, रविंद्र विसपुते, विजय विसपुते, बंडू घोडके, शांताराम रणधीर, विश्वनाथ विसपुते, ज्ञानेश्वर विसपुते, बापू दंडगव्हाळ, मंगेश विसपुते, सनी विसपुते, निंबराज विसपुते, अनमोल विसपुते, अनुप सोनार, अशोक बागुल, अनिकेत सोनार, अशोक दाभाडे, चंद्रकांत सोनार, गणेश दुसाने, निखिल दाभाडे, निलेश दुसाने, राहुल सोनवणे, रोहित सोनार, दीपक जडे, डॉक्टर किशोर रणधीर, हर्षल मोरे, तुषार जडे, कृष्णा विसपुते, मोहन घोडके, मोहन बागुल, निलेश सोनार, राजूभाऊ कुलथे, संदीप बिरारी, श्याम घोडके, स्वप्निल सोनार, विजय सोनार, विशाल सोनार, सुधीर यादव, योगेश जडे, अविनाश सोनार, अनिल सोनार, सुरेश सोनार, राकेश सोनार, रवींद्र अहिरराव, संजय कावडीकर, प्रकाश दुसाने, गोरखनाथ रणधीर, मदन विसपुते, विनोद सोनार, किरण विसपुते, मनोज विसपुते, सोपान जडे, नंदकिशोर वडनेरे, एकनाथ घोडके, जयवंत बागुल, विजय पवार, भास्कर मोरे, सुरेश जाधव, राजेंद्र विसपुते, निळकंठ विसपुते, रविंद्र रणधीर आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!