जळगावमहाराष्ट्रसामाजिक

मांडकी देवस्थानात दि. ४ रोजी संत बाळु मामांचा जन्मोत्सव.!!!

मांडकी देवस्थानात दि. ४ रोजी संत बाळु मामांचा जन्मोत्सव.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

तालुक्यातील श्री क्षेञ मांडकी येथील श्री. संत सदगुरु बाळु मामा मंदिरात दि. ४ रोजी शनिवारी दुपारी ४.२३ वाजता श्री. संत बाळु मामा यांचा जन्मोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे.त्यानिमित्त विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यादिवशी सकाळी ५ वाजता श्रींचा अभिषेक व पादयपुजन. सकाळी ७.३० वाजता श्रींची आरती. दुपारी १ वाजेपासुन भजन संगीत संध्येचा सुरेल कार्यक्रम होणार आहे.तळई येथील हभप. किर्तनकार महाराज मुक्ताई यांचा ज्ञानप्रबोधीनी भजनी मंडळ कार्यक्रम होईल. त्यानंतर दुपारी ४.२३ वाजता संत बाळु मामांचा जन्मोत्सव पाळणा म्हणुन व पुष्प वर्षाव करुन व भंडारा उधळुन साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर महाआरती होईल. नंतर कण्यांचा प्रसादाचा कार्यक्रम होईल. तरी श्रींच्या जन्मोत्सवासह विविध कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आव्हान मांडकी देवस्थानाचे हभप. सुभाष चौधरी व ग्रामस्थ मंडळींनी केले आहे.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!