श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा

0 48

श्री नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा

पारोळा प्रतिनिधी :-

पारोळा – जगद्गगुरू रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ, नाणीजधाम) यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.सदर सोहळा हा येत्या सोमवारी व मंगळवारी म्हणजेच ११ व १२ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता जगद्‌गुरु रामानंदाचार्य दक्षिण पीठ उपपीठ उत्तर महाराष्ट्र (श्रीक्षेत्र रामशेज ता.दिंडोरी जि.नाशिक) येथे संपन्न होत आहे.सोहळ्याचे औचित्य साधून ११ रोजी उपासक दीक्षा तर १२ रोजी साधक दीक्षा संपन्न होणार आहे.सोहळ्याचा जास्तीस जास्त भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

दरम्यान रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजींच्या “तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा” ह्या दिव्य शिकवणीतून, संस्थानाच्या वतीने असंख्य सामाजिक,नागरी हित व उपयोगी उपक्रम हे दररोज राबविले जातात.त्यात महामार्गांवर विनामूल्य ५३ रुग्णवाहिका,विनामूल्य इंग्रजी माध्यमाची शाळा,शेकडो मरणोत्तर देहदान अवयवदान, विनामूल्य ब्लड-इन-नीड सेवा,लाखो रक्तदान शिबिर, ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रम,वैद्यकीय उपक्रम,आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण,आपत्कालीन मदत उपक्रमांचा समावेश आहे.तर कोरोना काळातही संस्थानातर्फे मदत निधी हा गरजूंना पुरविण्यात आला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!