करोडपती स्कूल येथे तालुकास्तरीय कॅरम क्रीडा स्पर्धेचे आयोजन.!!!
पारोळा प्रतिनिधी :-
येथील सौ.एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते.स्पर्धेचे उद्घाटन संस्थाध्यक्ष उमेश करोडपती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. सचिन बडगुजर,पारोळा तालुका क्रीडा समन्वयक संदीप पवार,क्रीडाशिक्षक बाविस्कर,अकबर कुरेशी, प्रविण जाधव,सी.वी.निकम,
मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील,प्रा.विजय बडगुजर, प्राचार्या स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी क्रीडाशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कॅरम या स्पर्धेत तालुक्यातील विविध विद्यालयातून चौदा आणि सतरा वर्ष वयोगटातील २० विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.यावेळी संस्थाध्यक्ष उमेश करोडपती यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, चिकाटी आणि खेळातील शिस्त यांचे महत्त्व पटवून दिले.संदीप पवार यांनी तालुका,जिल्हा आणि विभागातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती देत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घ्यावा असे आवाहन केले.डॉ सचिन बडगुजर यांनी संघभावना आणि प्रेरणादायी क्रीडाशैली यावर भाष्य केले.प्राचार्या स्वाती बलखंडे यांनी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मेहनतीने पुढे जावे असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन किशोर महाजन यांनी केले.