निपाणे येथे जुगार अड्ड्यावर छापा; आठ जण ताब्यात, रोकड व जुगार साहित्य जप्त.!!!
कासोदा प्रतिनिधी :-
एरंडोल तालुक्यातील निपाणे गावात ग्रामपंचायत शेजारील मंगल कार्यालयाच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी धाड टाकत आठ जणांना रंगेहात पकडले. ही कारवाई २ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
सपोनी निलेश राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे हे पथक तयार करण्यात आले होते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने पंचा समक्ष छापा टाकून कारवाई केली.
पोलिसांनी धाडीत खालील जुगाऱ्यांना ताब्यात घेतले: कैलास तुकाराम पाटील, प्रमोद बाळकृष्ण बियाणी, मनोज शालिक महाजन, गोपीचंद नाना पाटील, वाल्मीक नारायण पाटील, संभाजी दरवेश पाटील, दीपक लक्ष्मण माळी आणि सुरेश लक्ष्मण भिल – सर्व रा. निपाणे, ता. एरंडोल.
जुगार खेळत असलेला विजय माणिक पाटील हा पोलिसांचा छापा पडताच घटनास्थळावरून फरार झाला. आरोपींच्या अंगझडतीत पोलिसांना एकूण २७०० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य मिळून आले.
या प्रकरणी पोलीस नाईक समाधान तोंडे यांच्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.उ.नी. रामकृष्ण पाटील हे सपोनी निलेश राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
ही कारवाई नितीन सूर्यवंशी, समाधान तोंडे, निलेश गायकवाड यांच्या पथकाने केली.