लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर शाळेची निसर्गरम्य वातावरणात अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित, लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथील निसर्गरम्य वातावरणात अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट संपन्न झाली. महानुभव पंथाच्या श्री चक्रधर स्वामींच्या पावन स्पर्शाने पवित्र अशा मंदिरात शाळेची क्षेत्रभेट झाली. विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात मिष्टांनं भोजनाचा आस्वाद घेतला. शाळेतील शिक्षिका श्रीमती अनिता सैंदाणे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप करण्यात आली.विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्याचा आविष्कार सादर करत मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी शालेय शिस्तीचे प्रदर्शन करत निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास केला.
शाळेतील श्री ज्ञानेश्वर गांगुर्डे सर यांनी महानुभव पंथाच्या बाबतीत सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. चक्रधर स्वामींच्या ऐतिहासिक संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना दिली. महानुभव पंथाच्या शिकवण बाबत उपदेश केला. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम संपन्न झाला. शाळेतील श्रीमती संगीता शेलार, सुनिता देवरे,अनिता सैंदाणे, श्री अनंत हिरे,ज्ञानेश्वर गांगुर्डे,सुयोग पाटील, सचिन पाटील,हरिचंद्र पाटील, किरण पाटील यांनी क्षेत्रभेट यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.