जळगावमहाराष्ट्रसामाजिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी.!!!

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्सवात साजरी.!!!

भडगाव ता.प्रतिनिधी आमीन पिंजारी

कजगाव तालुका भडगाव येथे एक ऑगस्ट 2025 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध कार्यक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सामाजिक न्याय व सांस्कृतिक चळवळीचे सशक्त प्रतिनिधी असलेल्या अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कजगाव ग्रामपंचायत येथे कजगाव चे उपसरपंच सादिक मन्यार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले , यावेळी कजगाव ग्रामपंचायत येथे भावेश साठे या मुलाने अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले यावेळी जगन साठे, हरी साठे, अण्णा साठे, प्रकाश साठे, शरद साठे, ग्रामपंचायत सदस्य सीताबाई सोनवणे, उत्तम मोरे, माझी उपसरपंच पुंडलिक सोनवणे, शिवसेना तालुका संघटक अनिल महाजन, दिनेश टेलर , बबलू नाना , रवींद्र मालचे , संजय पवार ,राहुल साठे, सुभाष साठे, गंगाराम साठे, सनी नवगिरे, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!