जळगावमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिक

गोंडगाव विदयालयात विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.!!!

गोंडगाव विदयालयात विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

भडगाव तालुक्यातील गोंडगाव माध्यमिक विदयालयात भडगाव पोलीस स्टेशन मार्फत आयोजीत विदयार्थी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रम दि. १ रोजी सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. नन्नावरे सर हे होते.

यावेळी भडगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करंकाळ यांनी मार्गदर्शन करतांना विदयार्थ्यांना सांगीतले कि, विदयार्थ्यांनी शाळेचा परीसर स्वच्छ ठेवावा. सीसीटीव्ही कॅमेर्यांची तोडफोड करु नये. झाडे तोडु नये. शासकीय मालमत्तेचे नुकसान करु नये. तसेच गुडटच व बॅडटच याबाबत विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. मोबाईलचा योग्य वापर करावा.मोबाईलवरची लिंक ओपन करु नये. गेम खेळतांना करमणुक म्हणुन वापर करा. व्हिडीओ काॅल व अनोळखी फोन उचलु नये.शाळेत एकमेकांचे हेवेदावे करु नये. आनंदात राहावे.रागात काही घटना घडतील असे वागु नका. याची काळजी घ्या.टवाळखोर मुले ञास देत असतील तर *शिक्षकांना सांगा. घरी आई वडीलांना सांगा. तसेच आता पासुन विदयार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा.जेणेकरुन पुढे स्पर्धा परीक्षांसह इतर परीक्षांमध्ये

तुमचा फायदा होईल. इतर क्षेञात नोकर्या मिळतील. असे अनमोल मार्गदर्शन पोलीस उप निरीक्षक लक्ष्मी करंकाळ यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन करतांना केले. तसेच मुला मुलींशी संवाद साधला.

कार्यक्रमात विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. नन्नावरे यांनी मनोगतातुन विदयार्थ्यांना शिस्तीचे पालन करा. नियमांचे पालन करा. चांगला अभ्यास करावा. असे अनमोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुञसंचलन श्री.एस. डी. चौधरी यांनी केले. तर आभार श्री. व्हि. ए. पाटील यांनी मानले. सुरुवातीस विदयालयामार्फत पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी कंरकाळ यांचा सत्कार विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. नन्नावरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केला. तर पोलीस हेडकाॅन्सटेबल श्री.निलेश ब्राम्हणकार, होमगार्ड श्री. समाधान देशमुख आदि पोलीस अधिकारी, कर्मचार्यांचा सत्कार श्री. आर. एस. पाटील, श्री.ए. एम. परदेशी आदिंचे हस्ते करण्यात आले.

यावेळी विदयालयाचे मुख्याध्यापक आदरणीय बापुसो, श्री. बी. जी. नन्नावरे, श्री.एस. डी. चौधरी, श्री. आर. एस. देवकर, श्री. व्हि. ए. पाटील, श्री.एस. आर. पाटील, श्री.एस. वाय. पाटील, श्री.पी. व्हि. सोळंके, श्री.बी. डी. बोरसे, श्री.एस. एस. आमले , श्री.आर. एस. सैंदाणे, श्री.एन. ए. मोरे, श्री.पी. जे. देशमुख, श्री. एस. जी. भोपे, श्री.ए. एम. परदेशी, श्री.एस. एल. मोरे, श्री. व्हि. एम. जाधव आदि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी, विदयार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.

अबरार मिर्झा

मुख्य संपादक, महाराष्ट्र डायरी अनेक वर्षांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव लाभलेले अबरार मिर्झा हे महाराष्ट्रातील एक निष्ठावान, परखड व समाजाभिमुख पत्रकार म्हणून मान्यता प्राप्त आहेत. सत्यनिष्ठा, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि निर्भीड मांडणी ही त्यांच्या पत्रकारितेची मूलभूत मूल्ये असून, त्यांच्या कार्यातून समाजहिताला प्राधान्य देण्याची भूमिका सातत्याने प्रतिबिंबित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!