लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.!!!

0 34

लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित लाडकुबाई प्राथमिक विद्यामंदिर येथे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवन चरित्रावर उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले. वकृत्व स्पर्धेत ५३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन चरित्रावर नाटिका सादर केली.

मुख्याध्यापक श्री कमलेश शिंदे सर यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवन चरित्र विद्यार्थ्यांसमोर मांडले. माणूस कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्माला आला त्यापेक्षा त्याने कोणते कार्य केले हे जास्त महत्त्वाचे असते. अल्पशिक्षित असून देखील त्यांनी दर्जेदार साहित्य जगाला दिले. राज्य शासनाचा पुरस्कार देखील त्यांच्या फकीरा या कादंबरीला मिळाला. अशा शब्दात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव केला.तसेच टिळकांचे प्रेरणादायी विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले. वकृत्व स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेचे मुख्याध्यापक कमलेश शिंदे सर यांनी बक्षीस देऊन सन्मान केला. फलक लेखन श्री अनंत हिरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिता देवरे यांनी केले. शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!