खानदेशच्या लोकप्रिय खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश.!!!
चेन्नई-जोधपूर एक्सप्रेसला अमळनेरमध्ये थांबा मंजूर; धरणगावकरांसाठीही आनंदाची बातमी.
खानदेशच्या लोकप्रिय खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश.!!!
चेन्नई-जोधपूर एक्सप्रेसला अमळनेरमध्ये थांबा मंजूर; धरणगावकरांसाठीही आनंदाची बातमी.
जळगाव प्रतिनिधी :-
खानदेशातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चेन्नई-जोधपूर एक्सप्रेस (गाडी क्र. 22663/22664) ला आता अमळनेर रेल्वे स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या रेल्वेसेवेचा थांबा मंजूर झाल्याने राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या राज्यांदरम्यानचा प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा ठरणार आहे.
या निर्णयामागे खासदार स्मिता वाघ यांचा मोलाचा वाटा आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या रेल्वे मंत्रालयाशी सातत्याने पाठपुरावा करत होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधून, लोकांची मागणी शासनदरबारी पोहोचवत त्यांनी ही सुविधा मंजूर करून घेतली. अखेर, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली.
याचबरोबर, अजून एक सकारात्मक बातमी म्हणजे, ताप्ती गंगा एक्सप्रेस (19045/46) या गाडीला लवकरच धरणगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याचे संकेत रेल्वेमंत्रालयाकडून मिळाले आहेत. लवकरच याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
ZRUCC सदस्य प्रतीक जैन (पश्चिम रेल्वे) यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली असून, खान्देश प्रवासी असोसिएशन, अमळनेर आणि धरणगावमधील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत खासदार स्मिता वाघ यांचे आभार मानले आहेत.
खासदार स्मिता वाघ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले –
> “हा केवळ एका गाडीचा थांबा नाही, तर अमळनेरच्या सर्वांगीण विकासाचा मैलाचा दगड आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी आणखीही प्रयत्न सुरूच राहतील.”