चोरट्या दारू विक्रीचा पर्दाफाश – एरंडोल पोलिसांची कारवाई.!!!
कासोदा वार्ताहर
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या “ऑल आऊट” मोहिमेंतर्गत एरंडोल तालुक्यातील आंबे-ब्राम्हणे गावात चोरट्या दारू विक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
दि. 21 जुलै 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता एरंडोल पोलिसांनी ताडे रस्त्यालगत चाऱ्याच्या कुट्टीच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकून किरण भारत पाटील (वय 39, रा. ब्राम्हणे) याला देशी व विदेशी दारूसह ताब्यात घेतले.
जप्त दारूचा तपशील असा आहे:
मॅकडॉवेल नं. 1 (व्हिस्की) – ₹3,360 (21 बाटल्या)
रॉयल चॅलेंज – ₹4,480 (18 बाटल्या)
गोवा जिन – ₹6,300 (36 बाटल्या)
ओल्ड मंक रम – ₹5,510 (38 बाटल्या)
मॅकडॉवेल रम – ₹945 (7 बाटल्या)
रॉयल स्टॅग – ₹4,200 (21 बाटल्या)
ऑफिसर्स चॉईस – ₹3,250 (26 बाटल्या)
सखु संत्रा (देशी) – ₹760 (19 बाटल्या)
टँगो पंच – ₹4,305 (123 बाटल्या)
सोफ डिलक्स – ₹4,865 (139 बाटल्या)
एकूण जप्त दारू किंमत – ₹38,175/-
किरण पाटील याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65(ई) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, तो सदर दारू विक्रीसाठी बेकायदेशीरपणे साठवून ठेवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.