मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भडगावमध्ये रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भडगाव येथील शासकीय विश्रामगृहात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला माजी आमदार श्री. दिलीपभाऊ वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या शिबिरात चाळीसगाव येथील जीवन सुरभी ब्लड बँकेच्या माध्यमातून ७५ रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.
रक्तदान शिबिराचे आयोजन कजगाव व भडगाव मंडळ अध्यक्ष श्री. अनिल मुरलीधर पाटील व श्री. प्रमोद देविदास पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाला भडगाव शहर व तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख, बुथप्रमुख आणि असंख्य सक्रिय सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.