सन्मान स्वच्छतेच्या खऱ्या शिल्पकारांचा.!!!
भडगाव प्रतिनिधी:-
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२४ मध्ये भडगाव नगरपरिषदेने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावत एक गौरवशाली यश संपादन केले आहे! या यशाचे खरे श्रेय जाते आपल्या स्वच्छतादूत बांधव-भगिनींना – ज्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळे भडगाव शहर स्वच्छतेच्या दिशेने उजळून निघाले आहे.
या निमित्ताने शिवसेना – युवासेना व स्व. बापुजी युवा फाउंडेशन यांच्या वतीने नगरपरिषदेचे मा. मुख्याधिकारी श्री. रविंद्र लांडे साहेब आणि १२५ सफाई कर्मचारी बांधव-भगिनींचा सत्कार समारंभ फाउंडेशनचे संस्थापक श्री. लखीचंद भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यसम्राट आमदार मा. किशोर आप्पा पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. विशाल पाटील, मा. नगराध्यक्ष राजू जिभू पाटील, युवराज आबा पाटील, डॉ. प्रमोद पाटील, नगरसेवक जग्गू भोई, जितू आचारी, विजू भोसले, तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, शहरप्रमुख नंदकिशोर पाटील, आबा चौधरी, दुर्गेश वाघ, चंद्रकांत पाटील, शेख वकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी फाउंडेशनचे संचालक पिंटू मराठे, महेंद्र ततार, निलेश पाटील, जहांगीर मालचे, सुरेश सोनवणे, चेतन राजपूत, पप्पू पाटील, रघुनंदन पाटील, महेश पाटील, प्रशांत सोनवणे, चेतन काळे, दिग्विजय राजपूत, तेजस पाटील, विनय पाटील, सुनील राजपूत, किशोर राजपूत, प्रदीप पाटील, दर्शन शिंपी, सुदर्शन कोळी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रविण महाजन सर यांनी केले.
> “सफाई कामगार म्हणजेच शहराचा आत्मा – त्यांना दिलेला सन्मान हाच खऱ्या भारताची ओळख दर्शवतो!”