कजगाव परिसरात पावसाची दांडी; बळीराजा चिंतेत.!!!
भडगाव ता. प्रतिनिधी – आमीन पिंजारी
कजगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने कमाल तापमानात वाढ झाली असून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. जून आणि जुलैच्या सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या, मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने शेतीवरील संकट वाढले आहे.
पावसाअभावी पिकांची वाढही समाधानकारक नाही. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत असून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, हवामान विभागाने २५ ते २६ जुलैदरम्यान जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे बळीराजाला थोडा दिलासा मिळाला असून, तो आता पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.