भडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक.!!!

0 1,454

भडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत; जबरी चोरीप्रकरणी चौघांना अटक.!!!

भडगाव प्रतिनिधी :-

कजगाव-गोंडगाव रस्त्यावर ४ जुलै रोजी एका फील्ड मॅनेजरवर झालेल्या जबरी चोरीचा भडगाव पोलिसांनी छडा लावत चौघा आरोपींना अटक केली असून, एकूण ३७,००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

फिर्यादी विक्की विटोबा पाटील (वय २४, रा. भालगाव बु., ता. एरंडोल) हे भारत फायनान्स कंपनीत फील्ड असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. पथराड येथून हप्ते वसूल करून परत येत असताना सायंकाळी साडेसातच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवून मारहाण केली. त्यांनी ५८,४०० रुपये रोख, ५,००० रुपयांचा सॅमसंग टॅब आणि २,००० रुपयांचे बायोमॅट्रिक मशीन असा एकूण ६५,४०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेला.

या प्रकरणी भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २६०/२०२५ नोंदवण्यात आला होता. पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची दिशा ठरवत आरोपींचा शोध सुरू केला. फिर्यादीचा टॅब शेवटचं बांबरुड येथे लोकेट झाल्याने संशयित गोपाल संजय पारधी (रा. पथराड) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर इतर आरोपी – मयुर ज्ञानेश्वर साळुंखे (२२), अतुल नाना पाटील (२६) व कैलास वाल्मिक पाटील (२७) – यांनाही अटक करण्यात आली.

जप्त मुद्देमाल – ₹३७,०००

1. अर्धवट जळालेलं बायोमॅट्रिक मशीन – ₹२,०००

2. अर्धवट जळालेली कागदपत्रं – ₹५,०००

3. सॅमसंग टॅब (राखाडी रंग) – ₹५,०००

4. बजाज प्लॅटीना (MH 54 A 8551) – ₹१०,०००

5. हिरो स्प्लेंडर प्लस (MH 54 A 7375) – ₹१०,०००

6. रोख रक्कम – ₹१०,०००

या यशस्वी कारवाईचे श्रेय मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पो.उपनिरी. सुशील सोनवणे, पोहेकाँ किशोर सोनवणे, पोहेकाँ, निलेश भालचंद्र ब्राम्हणकर,

पोकाँ प्रविण परदेशी, पोका, सुनिल जयसिंग राजपुत, पोकाँ संदीप सोनवणे,यांनी केली असुन

गुन्हाचा पुढील तपास पो.उपनिरी. सुशील सोनवणे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!