आषाढी एकादशी निमित्त पिंपळगाव हरेश्वर व अंतुर्ली येथे महाआरतीचा भव्य सोहळा संपन्न.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पिंपळगाव हरेश्वर/अंतुर्ली, दि. ५ जुलै २०२५ —
आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचा पवित्र संगम! याच पावन दिवसानिमित्त पिंपळगाव हरेश्वर येथील ‘प्रति पंढरपूर’ आणि अंतुर्ली गावात महाआरतीचा भव्य सोहळा पार पडला.
पिंपळगाव हरेश्वर येथे महाआरती
विठ्ठलनामाच्या जयघोषात दुपारी बारा वाजता महाआरतीचा सोहळा पार पडला. यावेळी आमदार कार्यसम्राट किशोर आप्पा पाटील, खासदार सौ. स्मिता ताई वाघ, तसेच माजी आमदार दिलीप वाघ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
‘ज्ञानोबा माऊली’ आणि ‘जय जय रामकृष्ण हरी’ च्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिरसाने न्हालून निघाला.
अंतुर्ली येथे ऐतिहासिक महाआरती
१०० वर्षांची परंपरा लाभलेल्या अंतुर्ली येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळी ७ वाजल्यापासून पूजन व महाआरतीस प्रारंभ झाला.
महाआरती आ. किशोरआप्पा पाटील व सौ. सुनीताताई पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
उपस्थित मान्यवर आणि जनसमुदाय
दोन्ही ठिकाणी हजारो वारकरी आणि श्रद्धाळू भाविकांनी सहभाग घेतला.
या भक्तिमय सोहळ्याला उपस्थित होते:
शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गणेश पाटील
सुनील पाटील, बंडूभाऊ सोनार, अतुल पाटील
तसेच अनेक स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ
टाळ-मृदंगाचा निनाद, हरिपाठाचा गजर
टाळ-मृदंगाच्या तालावर, हरिपाठाच्या अखंड स्वरात आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.गावागावातून आलेल्या वारकऱ्यांनी एकत्र येत ही परंपरा पुढे नेत ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.“पुढील वर्षीही अशीच भक्ती, श्रद्धा आणि एकोप्याची जाणीव ठेवत ही परंपरा अखंड सुरू राहो… विठ्ठल नामाचा गजर अखंड चालू राहो!”