बालविवाह,पॉक्सो प्रकरणात आरोपींना जामीन
पारोळा प्रतिनिधी :-
पारोळा – बालविवाह, सहजीवन प्रकरणात दाखल पॉक्सो कायद्यातील गुन्ह्यात असलेले तीन आरोपींना अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.यात नवऱ्यासह सासरा व दिराची सुटका झाली आहे.
पीडिता ही तेरा वर्षीय असताना तिचा विवाह एका तरुणाशी करण्यात आला होता.विवाहानंतर कालांतराने ती गर्भवती होऊन बाळाला जन्म दिला,याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली.
याप्रकरणी पीडितेच्या जबाबावरून नवऱ्यासह सासरा व दिर यांच्याविरूद्ध पॉक्सो,बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात आरोपी पक्षातर्फे अॅड.सिद्धांत उज्वल मिसर यांनी युक्तीवाद केला.हा निकाल न्याय,समाज आणि वास्तव यामधला समतोल साधणारा असुन, न्यायालयाने लक्षपूर्वक निर्णय दिल्याचे सांगितले.